लेकाच्या भेटीसाठी लंडनची आस…सांगोला तालुक्यातील पवार दाम्पत्याचा मृत्यू

लेकाच्या भेटीसाठी लंडनची आस…सांगोला तालुक्यातील पवार दाम्पत्याचा मृत्यू

लेकाच्या भेटीसाठी सांगोला तालुक्यातील महादेव तुकाराम पवार (68) आणि त्यांच्या पत्नी आशा पवार ( 60) हे लंडनला निघाले होते. मात्र भयंकर अपघातात पवार दांपत्याचा मृत्यू झाला. लेकाच्या भेटीची आस पूर्ण झालीच नाही. दरम्यान, पवार दांपत्याच्या मृत्यूचे वृत्त समजताच त्यांच्या नातेवाईकांच्या आश्रूंचा बांध फुटला. गावात हळहळ व्यक्त होत आहे.

पवार दांपत्याचे मूळ गाव सांगोला तालुक्यातील हातीद आहे. सध्या ते गुजरातमधील खेडा जिह्यातील नडियाद गावात मुलगा रमेशकडे वास्तव्यास होते. महादेव पवार हे नडियाद येथील कापड मिलमध्ये काम करत होते. ते निवृत्त झाले होते. पवार दापत्याचा मोठा मुलगा शैलेश हा लंडनमध्ये आहे. त्याचा लंडनमध्ये बेकरीचा व्यवसाय आहे. मुलाला भेटण्यासाठी पवार दांपत्य लंडनला निघाले होते. मात्र काळाने त्यांच्यावर घाला घातला. विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला. अवघ्या पंधरा दिवसांपूर्वीच महादेव आणि आशा पवार हे दोघे त्यांच्या मूळ गावी हातीद येथे भावांना भेटण्यासाठी आले होते. या भेटीनंतर काही दिवसांतच त्यांच्यावर काळाने झडप घातल्याने हातीद गावावर शोककळा पसरली आहे.

चार मराठी कुटुंबांवर कोसळला दु:खाचा डोंगर; दोन क्रू मेंबरसह को-पायलट, एअर हॉस्टेसचा मृत्यू

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;