कोल्हापुरात ढगफुटीसदृश पाऊस; अर्ध्या तासात रस्त्यांच्या झाल्या नद्या

कोल्हापुरात ढगफुटीसदृश पाऊस; अर्ध्या तासात रस्त्यांच्या झाल्या नद्या

कानठळ्या बसणाऱया ढगांच्या गडगडाटासह सायंकाळी चारच्या सुमारास शहरात ढगफुटीसदृश कोसळलेल्या पावसाने कोल्हापूरकरांची चांगलीच दैना उडवली. सुमारे तासभर झालेल्या या धुवांधार पावसाने रस्त्यांवरून अक्षरशः नद्याच वाहू लागल्याने अनेकांच्या घरांत पाणी शिरले. त्यात अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याने तर सर्वांचीच तारांबळ उडाली होती.

गेल्या महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात जिह्यात झालेल्या धुवाँधार पावसाने पुरसदृश स्थिती निर्माण झाली होती. पण जूनच्या पहिल्या आठवडय़ात काहीसा दिलासा मिळाला होता. आता गेल्या दोन दिवसांपासून सर्वत्र पावसाने हजेरी लावल्याचे दिसून येत आहे. आज पहाटेपासून पावसाची रिपरिप सुरू राहिली. दिवसभर विश्रांती घेतल्यानंतर सायंकाळी चारच्या सुमारास ढग दाटून आल्याने अचानक काळोख पसरला. ढगांच्या गडगडाटासह विजा चमकू लागल्या. कानठळय़ा बसणाऱया विजांमुळे काही भागांतील विद्युत पुरवठा खंडित झाला. त्यातच जोरदार पावसाला सुरुवात झाली. अचानक सुमारे अर्धा तास ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने, विक्रेत्यांसह, नागरिकांची धावपळ उडाली. अवघ्या अर्ध्या तासात शहरात जिकडे-तिकडे रस्त्यांवर पाण्याचे लोंढे वाहू लागले. शहरातील झालेल्या विकासकामांचा फटका ठिकठिकाणी बसल्याचे दिसून आले. अनेक घरांत गटारी, नाल्याचे पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली होती.

सातारा, सांगली, कोल्हापूरला ‘ऑरेंज अलर्ट’

दरम्यान, हवामान खात्याने राज्यात आज गुरुवारपासून मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यानुसार सांगली, सातारा, कोल्हापूर जिह्यांत ‘ऑरेंज’ अलर्ट देण्यात आला आहे. पुढील पाच दिवसांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;