सांगलीतील ह्युंदाई शोरूममध्ये दहा लाखांची चोरी, चोरट्यांनी तिजोरीच पळवून नेली

सांगलीतील ह्युंदाई शोरूममध्ये दहा लाखांची चोरी, चोरट्यांनी तिजोरीच पळवून नेली

कोल्हापूर रस्त्यावरील माय ह्युंदाई शोरूमध्ये घुसून पाच चोरटय़ांनी दहा लाखांची चोरी केली. शोरूममधील तगडय़ा सुरक्षा यंत्रणेला आव्हान देत चोरटय़ांनी भिंतीवरून आत प्रवेश केला. कटर, क्रू ड्रायव्हरने उचकटून तिजोरीच पळवून नेली. मध्यरात्री दोन वाजून 59 मिनिटांनी ही चोरी झाली. या वेळी चोरटय़ांनी सुरक्षा रक्षकांवर दगडफेक केली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत चोरटय़ांनी तिजोरी कटरने कापून रक्कम घेऊन पलायन केले. परिसरातील सीसीटीव्हीत पाच चोरटे कैद झाले असून, शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. शोरूमधील कर्मचारी संतोष रधुनाथ कोळी (वय 37, रा. पद्माळे, ता. मिरज) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

कोल्हापूर रस्त्यावर अंकली हद्दीत माय ह्युंदाईचे शोरूम आहे. शहरात येणारा हा प्रमुख रस्ता असल्याने चोवीस तास वर्दळ असते. बुधवारी नेहमीप्रमाणे शोरूम बंद करण्यात आले होते. मध्यरात्री दोनच्या सुमारास चोरटय़ांनी शोरूमच्या मागील बाजूने प्रवेश केला. शोरूमच्या भिंतीवर चढून पहिल्या मजल्यावरील खिडकीतून चोरटय़ांनी आत प्रवेश केला. त्यानंतर मुख्य दरवाजा उघडल्यानंतर आणखी दोघे चोरटे आत आले. जिन्याखाली असणाऱया कॅशियर कक्षाजवळ चोरटे आले. तेथील मुख्य दरवाजा न उचकटता काच अलगदपणे काढली. कॅश काउंटरवरून कक्षात प्रवेश करत तेथील गोदरेज कंपनीची तिजोरी तिघांनी उचलून बाहेर आणली. त्यावेळी सुरक्षारक्षकांना शंका आली. त्यांनी तपासणी करण्यास सुरुवात केल्यानंतर एका चोरटय़ाने सुरक्षारक्षकांवर दगडफेक केली. मागील बाजूस शेतात चोरटे तिजोरी घेऊन गेले. तेथेच कटरने तिजोरी कापून 9 हजार 532 रुपयांची सोन्याची नथ, नऊ लाख 59 हजार 451 रुपयांची रोकड असा दहा लाखांचा ऐवज घेऊन चोरटय़ांनी पोबारा केला. पोलीस उपअधीक्षक प्रणील गिल्डा, ग्रामीणचे निरीक्षक किरण चौगले, गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्यासह पथकाने घटनास्थळी भेट दिली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;