घरात पाळलेली 35 पेक्षा जास्त पाळीव मांजरे जप्त; कोल्हापूर मनपा आरोग्य विभागाची कारवाई

घरात पाळलेली 35 पेक्षा जास्त पाळीव मांजरे जप्त; कोल्हापूर मनपा आरोग्य विभागाची कारवाई

रंकाळा स्टॅण्ड परिसरातील आयरेकर गल्लीत प्रदीप बुलबुले आणि त्यांची पत्नी माधुरी बुलबुले यांनी घरात बेकायदेशीररीत्या पाळलेली 35 हून अधिक पाळीव मांजरे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून जप्त करण्यात आली. यावेळी घरातील दुर्गंधीयुक्त कचरा व अडगळ असा दोन ट्रक्टर भरून कचराही काढण्यात आला.

दरम्यान, या कारवाईवेळी तीन मांजरे पकडण्यात आली असून, उर्वरित पाळीव मांजरे पळून गेली. महापालिकेच्या एका कर्मचाऱ्यास मांजर चावल्याने संबंधित कर्मचाऱयास उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या दाम्पत्याने घरात यापूर्वी 35 पेक्षा जास्त मांजरे पाळली होती. यामुळे घरात दुर्गंधीयुक्त कचरा व अडगळ करून ठेवल्याची तक्रार स्थानिक नागरिकांकडून महापालिकेकडे करण्यात आली होती. तसेच स्थानिक नागरिकांनी याबाबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रारदेखील दिलेली आहे.

महापालिका आरोग्य विभागाने आयरेकर गल्लीतील बुलबुले यांच्या घरी जाऊन बेकायदेशीर पाळीव मांजरे जप्त करून घरातील दुर्गंधीयुक्त कचरा व अडगळ असा 2 ट्रक्टर भरून कचरा काढला. घरामध्ये कचरा व घाण असल्याने संपूर्ण गल्लीत दुर्गंधी पसरली होती. अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, सहायक आयुक्त कृष्णा पाटील व पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक स्वप्नील उलपे, नंदकुमार पाटील, सहायक आरोग्य निरीक्षक दिलीप पाटणकर, सूरज घुणकीकर, मुकादम व कामगारांनी ही कारवाई केली.

शहरामध्ये उघडय़ावर पडलेले 257 टायर जप्त

महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने डेंग्यू प्रतिबंध उपाययोजनेअंतर्गत शहरात वापरात नसलेले टायर जप्त करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत आज शहरामधून चारही विभागीय कार्यालयाअंतर्गत उघडय़ावर पडलेले 257 टायर जप्त करण्यात आले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;