धर्मांतरणासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून गर्भवती महिलेची आत्महत्या; पती, सासू-सासऱ्याला अटक, पोलीस कोठडी

धर्मांतरणासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून गर्भवती महिलेची आत्महत्या; पती, सासू-सासऱ्याला अटक, पोलीस कोठडी

सासरच्या मंडळींकडून धर्मांतरणासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून सात महिन्यांच्या गर्भवती विवाहित महिलेने आपल्या आयुष्याची अखेर केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी पतीसह सासू-सासरे या तिघांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. ऋतुजा सुकुमार राजगे (वय 27) असे या विवाहित तरुणीचे नाव आहे. 6 जून रोजी ऋतुजाने तिच्या सासरच्या घरी गळफास घेत आपल्या आयुष्याची दोर कायमची कापली. यावेळी ती सात महिन्यांची गर्भवती होती.

पुण्यातील वैष्णकी हगवणे मृत्यू प्रकरणाने सध्या संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. मात्र, त्यानंतरही राज्यात सासरच्या छळाला कंटाळून आपला जीव संपवण्याच्या घटनांमध्ये घट झालेली नाही. दररोज अशा घटना समोर येत आहेत. हुंडय़ापायी व इतर कारणांसाठी सासरच्या जाचाला कंटाळून महिला टोकाचा निर्णय घेत आहेत. या पार्श्वभूमीवर सांगलीतील गर्भवती विवाहितेने केलेल्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे.

सासरच्या मंडळींकडून ख्रिश्चन धर्म स्कीकारण्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून ऋतुजा राजगे हिने आत्महत्या केल्याचा आरोप ऋतुजाचे कडील चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. याप्रकरणी कुपकाड एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये ऋतुजाचा पती सुकुमार राजगे, सासरे सुरेश राजगे आणि सासू अलका राजगे यांच्याकिरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिघांनाही कुपकाड एमआयडीसी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने सर्वांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;