‘अलमट्टी’च्या उंचीला सरकारचा विरोधच! सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

‘अलमट्टी’च्या उंचीला सरकारचा विरोधच! सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीसंदर्भात सातत्याने चर्चा सुरु आहे. अलमट्टीमुळे सांगली, कोल्हापूर जिह्यांना पुराचा धोका निर्माण होत असल्याबाबत वेगवेगळे अहवाल आहेत. मात्र, राज्य सरकारचा अलमट्टी उंचीवाढीला विरोधच आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याची माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान जिह्यातील अपूर्ण सिंचन योजनांसाठी 5 हजार कोटींची गरज असून, त्याबाबतचा आराखडा तयार करण्याचे आदेश दिले.

वारणाली येथील जलसंपदा विभागाच्या कामांची आढावा बैठक घेतल्यानंतर जलसंपदा मंत्री विखे-पाटील बोलत होते. विखे म्हणाले, अलमट्टी धरणाच्या उंचीबाबत राज्य सरकार गंभीर आहे. अलमट्टीसंदर्भात राज्य सरकार न्यायालयात गेलेले नाही असे म्हणणे पूर्णतः चुकीचे आहे. राज्य सरकारने तेलंगणा आणि आंध्रप्रदेश सोबत चर्चा केली आहे. कोणत्याही परिस्थितीत अलमट्टीची उंची वाढू द्यायची नाही, हीच सरकारची भूमिका आहे, असेही विखे यांनी सांगितले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;