चंद्रभागेत होडीतून आसनक्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करू नका; जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची सूचना; होडीचालकांनी 15 जूनपर्यंत नोंदणी करावी

चंद्रभागेत होडीतून आसनक्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करू नका; जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची सूचना; होडीचालकांनी 15 जूनपर्यंत नोंदणी करावी

आषाढी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मोठय़ा प्रमाणात भाविक येतात. वारकऱ्यांसाठी चंद्रभागा स्नान फार महत्त्वाचे मानले जाते. चंद्रभागा स्नानासाठी नदीपात्रात मोठय़ा प्रमाणात भाविकांची गर्दी होते. तसेच येणारे भाविक चंद्रभागा नदीत नौकाविहार करतात. या कालावधीत कोणतीही अनुचित घडना घडू नये तसेच भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व होडीमालकांनी व चालकांनी आसनक्षमतेपेक्षा जास्त लोकांची वाहतूक करू नये तसेच 15 जूनपर्यंत होडय़ांची नोंदणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.

आषाढी यात्रेच्या अनुषंगाने श्री विठ्ठल-रुक्मिणी भक्तनिवास पंढरपूर येथे होडीमालक व चालक यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, प्रांताधिकारी सचिन इथापे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, भीमा पाटबंधारेचे कार्यकारी अभियंता एस. के. हरसुरे, तहसीलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी महेश रोकडे, उपकार्यकारी अभियंता ज्योती इंगोले, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तिसागर ढोले तसेच होडीमालक व चालक उपस्थित होते.

सूर्यास्तानंतर जलप्रवास वाहतूक बंद ठेवावी
आषाढी वारी कालावधीत चंद्रभागा नदीपात्रात साधारणतः 6 ते 8 हजार क्युसेक इतका विसर्ग आल्यास जलप्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद ठेवावी. सूर्यास्तानंतर जलप्रवासी वाहतूक करू नये. होडीत लाईफ जॅकेटची उपलब्धता ठेवावी. पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास भाविकांना नदीपात्रात जाण्यापासून परावृत्त करावे. यापूर्वीही चंद्रभागा नदीपात्रात भाविकांच्या सुरक्षेबाबत होडीचालक, मालकांचे प्रशासनास चांगले सहकार्य लाभले असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मोदी-शाह बोले.. भाऊ-भाई-दादा हले.. हिंदी सक्तीवरून अंबादास यांचा टोला मोदी-शाह बोले.. भाऊ-भाई-दादा हले.. हिंदी सक्तीवरून अंबादास यांचा टोला
केंद्र सरकारने घेतलेले निर्णय कुठलाही विचार न करता राज्याच्या माथी मारले जात आहेत अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे...
भांडूपमध्ये घराची भिंत कोसळून तीन जण जखमी, सर्वांची प्रकृती स्थिर
Homemade Facial – पार्लरमध्ये न जाताच आता तुम्हाला मिळेल फेशियल केल्याचं समाधान, या घरगुती उपायांनी तुमचा चेहरा चमकेल
फडणवीसांच्या मतदारसंघात अवघ्या 5 महिन्यात 8 टक्के मतदार कसे वाढले? राहुल गांधी यांचा सवाल
जून महिन्यातच रानसई धरण ओव्हर फ्लो, उरणकरांची पाण्याची चिंता मिटली
कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, गेल्या पाच महिन्यांत राज्यातून 17 हजारहून अधिक महिला बेपत्ता
Kitchen Cleaning Tips- किचनमधील लोखंडी तवा, कढईला गंज चढलाय का? करा हे उपाय कढई पुन्हा होईल नव्यासारखी