भुईकोट किल्ल्याजवळ आढळला 13 फुटी रॉक पायथन अजगर

भुईकोट किल्ल्याजवळ आढळला 13 फुटी रॉक पायथन अजगर

अहिल्यानगर येथील भुईकोट किल्ल्याजवळील ‘आय लव नगर गार्डन’जवळ मंगळवारी रात्री 13 फुटी रॉक पायथन अजगर आढळला. सामाजिक कार्यकर्ते व व्यापारी गोविंद जोशी, कौशल जोशी व करण पारखे यांना रात्री घरी जाताना हा अजगर दिसला. त्यांनी सर्पमित्र अमित गायकवाड यांनी त्या अजगराला पकडले. यावेळी अजगर पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. आज सकाळी या अजगराला जंगलात निसर्ग अधिवासात सोडून देण्यात आले.

अजगर हा जगात वावरणारा सर्वांत मोठा बिनविषारी सर्प आहे. सरीसृप वर्गातील बोइडी कुलातील पायथॉनिनी उपकुलात त्याचा समावेश होतो. जगाच्या विविध भागांत अजगराच्या अनेक जाती आढळतात. पायथॉन मोलुरस या जातीचे अजगर संपूर्ण हिंदुस्थानात आढळतात. याला रॉक पायथॉन असेही म्हणतात. झाडावर, खडकाळ जमिनींवरही यांचा वावर असतो.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;