कोल्हापूरच्या 12 धावपटूंनी पार केली ‘कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन’

कोल्हापूरच्या 12 धावपटूंनी पार केली ‘कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन’

दक्षिण आफ्रिकेतील जगप्रसिद्ध आणि सर्वाधिक खडतर समजली जाणारी ‘कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन’ ही 90 किलोमीटर अंतराची शर्यत कोल्हापूरच्या 12 धावपटूंनी यशस्वीरीत्या पूर्ण केली. यंदा 8 जून ही शर्यत पीटरमारिट्सबर्ग ते डर्बन या मार्गावर पार पडली. आज कोल्हापुरात या स्पर्धकांचे आगमन झाल्यानंतर त्यांचे छत्रपती ताराराणी चौकात स्वागत करण्यात आले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडूनही सन्मान करण्यात आला.

ही शर्यत 1921 साली सुरू झाली असून, यंदाचे हे 98वे वर्ष होते. जगभरातील विविध देशांतून 25 हजारहून अधिक धावपटूंनी यंदा यात सहभाग घेतला. यामध्ये हिंदुस्थानातून 400 पेक्षा अधिक धावपटूंनी या शर्यतीत सहभाग घेतला होता. यापैकी 50 महिला धावपटू होत्या, ही हिंदुस्थानसाठी विशेष अभिमानाची बाब ठरली. कोल्हापूरच्या चमूमध्ये 12 धावपटू सहभागी झाले होते, त्यापैकी 2 महिला धावपटूंनीदेखील ही अतिशय आव्हानात्मक शर्यत यशस्वीरीत्या पूर्ण केली.

कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन केवळ लांब अंतराची शर्यत नसून, ती शरीर, मन आणि इच्छाशक्तीची कसोटी असते. यंदाच्या मार्गामध्ये जवळपास 1200 मीटर उंचवटे होते आणि कोवाईज हिल, फिल्ड्स हिल, बोथाज हिल, इंचंगा, लिटल पॉली, पॉली शॉर्ट्स असे सात मोठे डोंगर व बऱ्याच छोटय़ा टेकडय़ा पार कराव्या लागल्या. या चढावांमुळे शर्यत अधिकच आव्हानात्मक ठरली.

रविवारी झालेल्या स्पर्धेच्या निकालातून प्रेरणा घेऊन 2027 मध्ये होणाऱ्या या शर्यतीच्या शतकोत्तर पर्वात, कोल्हापूरकडून जास्तीत जास्त स्पर्धक सहभागी व्हावेत, अशी अपेक्षा या चमूने व्यक्त केली.

या स्पर्धेत स्पर्धकांनी नोंदवलेली वेळ

चेतन चव्हाण – 10ः28, डॉ. विजय कुलकर्णी – 10ः52, दिलीप जाधव – 10ः55, गोरख माळी – 11ः45, सचिन बुर्से – 8ः15, स्वरूप पुजारी – 11ः44, विजय पाटील – 11ः57, आम्रपाल कोहली – 11ः34, सुष्मा रेपे – 11ः25, डॉ. केतकी साखरपे – 10ः56, डॉ. पराग वाटवे – 11ः40

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;