नराधम पतीने मित्रांकडूनच केला अत्याचार; दौंड तालुक्यातील भरतगावातील घटना, चौघांना बेड्या

नराधम पतीने मित्रांकडूनच केला अत्याचार; दौंड तालुक्यातील भरतगावातील घटना, चौघांना बेड्या

पत्नीला धमकावून जीवे मारण्याची धमकी देऊन पतीने तीन मित्रांना बायकोवर बलात्कार करण्यास भाग पाडल्याची धक्कादायक घटना दौंड तालुक्यातील भरतगाव येथे घडली आहे. मागील दोन वर्षांपासून आरोपींनी महिलेवर अत्याचार केले असून, पीडितेला सर्व असह्य झाल्यानंतर तिने यवत पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार पती आणि त्याच्या तीन मित्रांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी यवत पोलिसांनी चारही आरोपींना अटक केल्याची माहिती यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिली आहे.

तक्रारदार महिला आणि तिचा पती भरतगावात राहायला असून, 2023 पासून पतीने आपल्या पत्नीला धमकावून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर 3 मित्रांकडून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. धमकीच्या भीतीने तक्रारदार महिला सलग दोन वर्षांपासून गप्प बसली होती. मात्र, महिलेस शारीरिक व मानसिक त्रास सहन न झाल्याने तिने यवत पोलीस ठाण्यात धाव घेत आपबीती पोलिसांना सांगितली. त्यानुसार यवत पोलिसांनी महिलेच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्याच्या तीन मित्रांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करीत चारही आरोपींना अटक केली आहे. पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक महेश माने करीत आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;