Benefits Of Kansya Thali Foot Massage- उत्तम आरोग्यासाठी काशाच्या थाळीने तळपायाचा मसाज का करावा?
आपल्याकडे आयुर्वेदामधील ग्रंथामध्ये पादाभ्यंग सांगितलेले आहे. यामध्ये काश्याच्या वाटीने पायाला गायीचे तूप किंवा खोबरेल तेल चोळणे हा प्रमुख उपचार सांगितला आहे. सध्याच्या घडीला आपल्याला अनेक ठिकाणी कास्य थाळीने मसाज करताना दिसतात. कांस्य थाळीचे महत्त्व हे अबाधित आहे. कांस्य थाळी घरी नसेल तर काशाची वाटी असेल तरीही उत्तम. या थाळीने मसाज करण्याचे आरोग्यासाठी भरमसाठ फायदे होतात. खासकरुन वात असणाऱ्यांसाठी काशाची वाटी किंवा थाळी ही फार उपयोगी मानली जाते.
काशाच्या थाळीने मसाज करण्याचे अगणित फायदे
काशाच्या थाळीने किंवा वाटीने पायाच्या तळव्यांना मसाज केल्यास, शरीरात वाढलेली अतिरिक्त उष्णता खूप मोठ्या प्रमाणात कमी होते.
आपल्या डोळ्याच्या स्नायूंना चालना मिळण्यासाठी हा मसाज फार गरजेचा मानला जातो.
शरीरातील थकवा कमी होऊन थंडावा वाढविण्यासाठी, काश्याच्या थाळीचा मसाज हा प्रचंड फायदेशीर ठरतो.
मधुमेहामुळे अनेकदा आपल्या पायांना फार हानी पोहोचते, अशावेळी पायांच्या निरोगी आरोग्यासाठी काशाच्या थाळीने मसाज करण्याचे खूप फायदे होतात.
कमी वयात निद्रानाशाची समस्या असल्यास, ही समस्या आटोक्यात राहण्यासाठी काश्याच्या थाळीने किंवा वाटीने केलेला मसाज हा खूप फायदेशीर ठरतो.
वारंवार पित्ताचा त्रास होत असणाऱ्यांसाठी, काश्याच्या वाटीचा आणि थाळीचा मसाज फार फायदेशीर मानला जातो.
काश्याची वाटी आहे लहान, पण याचे फायदे आहेत आरोग्यासाठी महान…
अनेकांना कमी वयामध्ये गुडघेदुखी, टाच दुखी, कंबरदुखी असे त्रास उद्भवतात. अशांसाठी काश्याची वाटी वरदानापेक्षा कमी नाही.
आर्थरायटिसमध्ये पायावर सूज येण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे पायावरील सूज कमी करण्यासाठी काश्याच्या थाळीचा मसाज हा खूप गुणकारी आहे.
काशाच्या थाळीमुळे आणि वाटीच्या मसाजामुळे डोळ्याखालील काळी वर्तुळे कमी होतात. तसेच चेहऱ्यावरील काळे डागही कमी होण्यास मदत होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List