महायुतीच्या काळात कर्जात वाढ, जनतेच्या प्रश्नांवर उत्तर देण्याऐवजी सरकारने काढला पळ; अंबादास दानवेंची टीका

महायुतीच्या काळात कर्जात वाढ, जनतेच्या प्रश्नांवर उत्तर देण्याऐवजी सरकारने काढला पळ; अंबादास दानवेंची टीका

सरकारवर आधी 9 लाख 12 हजार कोटी रुपयांचे कर्ज होते ते आता 10 लाख कोटी रुपयांच्या वर गेले आहे. अंतिम आठवडा प्रस्तावावर उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर उत्तर देण्याऐवजी सभागृहात बाहेरील मुद्दे सत्ताधाऱ्यांनी मांडून जनतेच्या प्रश्नांपासून पळ काढल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. महायुती सरकार हे जनता विरोधी असल्याचा टीका दानवे यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

बोगस बियांचे मोठे प्रकार घडले असताना त्याबाबत कोणताही कायदा आणलेला नाही. या अधिवेशनात बऱ्याच मंत्र्यांनी टाईमपास केला आहे. जनतेच्या आणि महाराष्ट्राच्या विरोधातील हे सरकार कार्यभार चालविण्यास अपयशी ठरल्याचा आरोपही दानवे यांनी केला.

पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेता म्हणून मुंबईचे गिरणी कामगार, शिक्षकांचे प्रश्न, कायदा सुव्यवस्था भ्रष्टाचार, शालार्थ आयडी घोटाळा आदी मुद्द्यांवर सभागृहात आवाज उठविला. शक्तीपीठ महामार्ग, हिंदी सक्ती, मेघा इंजिनिअरिंगचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. मात्र सरकारने खुलासा केला नसल्याबाबत दानवे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

सत्तेतील आमदारांनी वारकऱ्यांना नक्षलवादी ठरवले. जलजीवन मिशन योजनेचा निधी अद्याप दिला नाही. उत्पादन शुल्क विभागामार्फत 328 परवाने देण्यात येणार आहे. 1972 पासून सत्ताधारी आमदारांना परवाने देण्याचे बंद होते ते आता सरकारच्या काळात सुरू होणार आहे.

कॅन्टीनमध्ये चड्डी बनियान गँगने आंदोलन केले. सत्ताधारी आमदार गावोगावी गोंधळ घालत आहे. जिथे कायदे बनवले जातात ते लोकशाहीचे मंदिर असलेल्या विधानभवनात कायदा मोडला गेल्याबाबत दानवे यांनी सरकारवर ताशेरे ओढले. मुख्यमंत्री यांनी स्वतःकडे अधिकार ठेवल्याने मंत्र्यांना अधिकार नाही. त्यामुळे बरेच मंत्री नैराश्यात असल्याचे दानवे म्हणाले.

सरकार अनेक योजनांच्या नावाखाली उधळपट्टी करत आहे. कमीत कमी महिला लाडकी बहीण योजने अंतर्गत याव्यात, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही दानवे यांनी केला. सत्ताधारी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने आरती करण्याचे काम करत होते. राज्यात दुबार पेरणी व तीबर पेरण्याची संकट आले असताना सत्ताधारी यांनी राजकीय भाषण केले. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे पाय चेपण्याचे काम केले. निधी अभावी अनेक विकास कामांचे कंत्राट बंद पडले आहेत. विकासाच्या वल्गना मांडल्या जातात. रोज एक उद्योग राज्याबाहेर जात असताना जनतेच्या भावनांची सरकार कोणतीही दखल घेत नसल्याबाबत सरकारवर टीकाही दानवे यांनी केली. सरकार जनतेच्या विकासासाठी पैसे देत नसून सातत्याने सभागृहात यावर आवाज उठविल्याचे दानवे म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

लॉस एंजेलिस पोलिस प्रशिक्षण केंद्रात मोठा स्फोट, तीन उप शेरीफ जागीच ठार लॉस एंजेलिस पोलिस प्रशिक्षण केंद्रात मोठा स्फोट, तीन उप शेरीफ जागीच ठार
अमेरिकेतील लॉस एंजेलिस काउंटी शेरीफ विभागाच्या बिस्केलुझ प्रशिक्षण केंद्रात शुक्रवारी मोठा स्फोट झाला. यात स्फोटात तीन उप शेरीफ अधिकाऱ्यांचा मृत्यू...
केळं खाल्ल्यावर पाणी पिणं योग्य की अयोग्य?
महायुतीच्या काळात कर्जात वाढ, जनतेच्या प्रश्नांवर उत्तर देण्याऐवजी सरकारने काढला पळ; अंबादास दानवेंची टीका
Chhattisgarh News – नारायणपूरमध्ये सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत 6 नक्षलवादी ठार
Mumbai News – बँकॉकहून मुंबईत गांजा तस्करी प्रकरणी मुंबई विमानतळावर प्रवाशाला अटक, सीमाशुल्क विभागाची कारवाई
Photo – सई… बोल्ड अ‍ॅण्ड ब्युटिफुल
महाराष्ट्रात पहिली ते पाचवी हिंदी आणायचा प्रयत्न तर करून बघा, दुकानं नाही शाळाही बंद करेन; राज ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान