नव्या चेहऱ्यांना संधी द्या, प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त करण्याची जयंत पाटील यांची मागणी
मला प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त करा अशी मागणी जयंत पाटील यांनी शरद पवार यांच्याकडे केली आहे. नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी असेही जयंत पाटील म्हणाले.
आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा 26 वा वर्धापनदिन साजरा होत आहे. यावेळी जयंत पाटील म्हणाले की, पवार साहेबांनी आज मला संधी दिली. सात वर्षांचा कालावधी दिला. शेवटी पक्षाने नवीन चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे. या निमित्ताने तुमच्या सर्वां देखत एवढीच साहेबांना विनंती करेन, शेवटी पक्ष शरद पवारांचा आहे, त्यामुळे पवार साहेबांनी योग्य तो निर्णय घ्यावा. आपल्याला आता बरंच पुढे जायचे आहे. मी पवार साहेबांचे याबाबत मी आभार मानतो असेही जयंत पाटील म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List