कोल्हापुरात शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू
On
विद्युत मोटरीचा फुटबॉलचा कचरा काढताना विजेचा धक्का बसून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी तुळशी नदीकाठ शिवारात उघडकीस आली. किसन चंद्राप्पा नलवडे (66, रा. धामोड, ता. राधानगरी) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. भात तरव्याला पाणी देण्यासाठी किसन नलावडे शेतीपंप चालू करण्यास गेले होते. दरम्यान, विद्युत मोटरपंप सुरू करण्यापूर्वी ते पाण्यात असलेल्या फुटबॉलचा कचरा काढण्यासाठी गेले असता, त्यांना विजेचा धक्का बसला. यातच त्यांचा मृत्यू झाला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List