माउलींच्या नीरा स्नानाच्या स्थळाची पाहणी; साताऱ्याचे पोलीस अधीक्षक, जि. प. सीईओ यांच्याकडून आढावा

माउलींच्या नीरा स्नानाच्या स्थळाची पाहणी; साताऱ्याचे पोलीस अधीक्षक, जि. प. सीईओ यांच्याकडून आढावा

पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या सीमेवरील नीरा नदीच्या दत्तघाटावर माउलींच्या पादुकांना गुरुवारी (दि.26) नीरा स्नान घालण्यात येणार आहे. त्या पाश्र्वभूमीवर सातारा जिल्हा प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू असून, त्याचा आढावा वरिष्ठांकडून घेण्यात येत आहे. साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी माउलींच्या नीरा स्नानाच्या स्थळाच्या व नीरा नदीवरील ब्रिटिशकालीन पुलाच्या सुरक्षाव्यवस्थेची, घाटाची, पाणीपुरवठा, स्वच्छता, जिल्हा स्वागताची तयारी पाहणी करून बुधवारी सकाळी आढावा घेतला.

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात माउलींच्या नीरा स्नानाला विशेष महत्त्व आहे. यंदा 26 जून रोजी दुपारी दीड वाजता माउली सातारा जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. त्या पाश्र्वभूमीवर सातारा जिल्ह्याच्या नवनिर्वाचित एसपींनी पुणे जिल्ह्यातील नीरा (ता. पुरंदर) हद्दीतून माउलींचा पालखी सोहळा नीरा नदीवरील जुन्या ब्रिटिशकालीन पुलाच्या संरक्षक कठड्यांसह पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना व नीरा स्नानावेळी आळंदी संस्थानच्या पालखी सोहळाप्रमुख व विश्वस्तांना माउलींच्या पादुका रथातून नीरा नदीवरील दत्तघाटावर नेताना सुरक्षेच्या दृष्टीने कोणताही पोलिसान हो सूचना दी किसान याची उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, लोणंदचे सहा. पोलीस निरीक्षक सुशील भोसले उपस्थित होते.

सातारा जिल्हा परिषदेच्या सीईओ याशनी नागराजन यांनी माउलींच्या नीरा स्नानाच्या स्थळासह, पाडेगांव, लोणंदला पाणीपुरवठा करणाऱ्या नीरा नदीवरील पाणीपुरवठा केंद्राची तसेच सातारा जिल्ह्याच्या हद्दीत माउलींच्या सोहळ्याचे ज्या ठिकाणी स्वागत होते, त्या ठिकाणी मंत्री, खासदार, आमदार, तसेच प्रशासनातील अधिकारी उपस्थित असतात. त्यांच्या बैठक व्यवस्थेसह स्वागताची तयारी कशी असेल, याबाबतची माहिती घेऊन अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. दरम्यान, नीरा नदीवरील दशक्रिया विधी घाटाचे काँक्रिटीकरण करण्याची मागणी पाडेगांव व परिसरातील ग्रामस्थांनी सीईओ याशनी नागराजन यांच्याकडे केली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;