शैक्षणिक संस्थेत प्रवेशाच्या आमिषाने फसवणारा गजाआड

शैक्षणिक संस्थेत प्रवेशाच्या आमिषाने फसवणारा गजाआड

शहरातील नामवंत शिक्षण संस्थेत प्रवेशाचे आमीष, तसेच शैक्षणिक संस्थेच्या नावाने बनावट संकेतस्थळ तयार करणाऱया फरारी आरोपीला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने कोलकाता विमानतळावरून ताब्यात घेत अटक केली. कुणालकुमार बिरेंद्रकुमार विद्यार्थी असे अटक केलेल्याचे नाव आहे. न्यायालयाने त्याला गुरुवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

त्याने शैक्षणिक संस्थेच्या नावाने बनावट संकेतस्थळ तयार केले होते. संस्थेत प्रवेशाच्या आमिषाने विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात 2 एप्रिलला आरोपी कुणालकुमार विद्यार्थी, आकाश यादव आणि दिव्या यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी त्यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस बजावली होती. मूळचा बिहारचा रहिवाशी असलेल्या आरोपी विद्यार्थीविरुद्ध 2021 मध्ये सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता.

z पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्याला पकडण्यासाठी पथके तयार केली होती. पुणे, मुंबई, दिल्लीत त्याचा शोध घेण्यात आला होता. त्यानंतर विद्यार्थी पत्नीसह थायलंडला निघाला असून, तो कोलकाता विमानतळावर येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. पथकाने कोलकाता विमानतळ परिसरात सापळा रचून त्याला पकडले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;