विमानाने पुण्यात येऊन चोऱ्या करणारे अटकेत

विमानाने पुण्यात येऊन चोऱ्या करणारे अटकेत

विमानाने पुण्यात येऊन जबरी चोऱया करणाऱया आंतरराज्यीय टोळीला खडकी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 70 हजारांचा ऐवज जप्त केला असून, आणखी मुद्देमाल मिळण्याची शक्यता आहे. एटीएम सेंटरमध्ये नागरिकांना मदतीचा बहाणा करणे, एटीएम कार्ड हिसकावून घेणे, नागरिकाला रोकड जास्त असल्याचे सांगत बोलण्यात गुंतवणे, मदत करण्याचा बहाणा करीत टोळक्याकडून चोऱया केल्या जात असल्याचे उघडकीस आले आहे. सावेज सलीम अली व नियाज इजाज मोहम्मद (दोघेही उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

एटीएम मशीनमधून पैसे काढून देतो अशी बतावणी करीत चोरटय़ांनी 9 मे रोजी संजय कदम (63) यांची खडकीत फसवणूक केली होती. कदम हे सुरक्षारक्षक असून, 12 हजार रुपये पगाराची नोकरी करतात. चोरटय़ांनी त्यांना मदतीच्या बहाण्याने एटीएम कार्ड बदलून देत आयुष्याभराची 1 लाख 5 हजारांची कमाई काढून घेतली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे यांनी आरोपींचा शोध घेण्याचे आदेश तपास पथकाला दिले होते. त्यानुसार तपास पथकाचे प्रमुख दिग्विजय चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली सीसीटिव्ही फुटेज व टेक्निकल माहिती प्राप्त करण्यात आली. पोलीस अमलदार प्रताप केदारी ऊर्फ आबा यांना आरोपींची माहिती मिळाली.

विमान प्रवास ते पुण्यातील लॉज

दोन्ही आरोपी सराईत असून, देशभरातील विविध शहरातंर्गत त्यांनी एटीएम सेंटरजवळ थांबून नागरिकांची लुट केली आहे. उत्तर प्रदेशातून विमानाने पुण्यात आल्यानंतर ते नाना पेठेतील लॉजमध्ये राहत होते. त्यानंतर कमी गर्दीच्या ठिकाणी एटीएम सेंटरमध्ये थांबवून ज्येष्ठ नागरिक सावज हेरत होते. त्यांना मदतीचा बहाणा करीत एटीएम कार्ड बदलून देणे, रक्कम काढत असताना पाठीमागे थांबून कोड पाहणे, कार्ड हिसकावून घेत आरोपी लुटमार करीत होते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;