‘आमदार’, ‘सावकार’ ओढणार माऊलींचा रथ, बैलजोड्यांची आळंदीत वाजतगाजत मिरवणूक

‘आमदार’, ‘सावकार’ ओढणार माऊलींचा रथ, बैलजोड्यांची आळंदीत वाजतगाजत मिरवणूक

आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील ‘श्रीं’चा पालखी रथ ओढणाऱ्या बैलजोडीची सेवा देण्याचा मान यावर्षी अर्जुन घुंडरे-पाटील, विवेक घुंडरे-पाटील यांना मिळाला आहे. रथ ओढण्यास राजा – प्रधान, आमदार – मल्हार सावकार – संग्राम आणि माऊली – शंभू या चारही बैलजोड्यांची आळंदीतील श्री स्वामी महाराज मठ येथून नगरप्रदक्षिणामार्गे मिरवणूक काढण्यात आली. शहरात ठिकठिकाणी ढोल-ताशांच्या दणदणाटात, फटाक्यांची आतषबाजी करून ग्रामस्थांनी बैलजोडींचे स्वागत केले. माऊली मंदिरासमोरील महाद्वारासमोर देवस्थानतर्फे बैलांची पूजा करण्यात आली.

मंदिराकडे जाणाऱ्या महाद्वार रस्त्यावर श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने बैलजोड्यांची पूजा करण्यात आली. स्वामी महाराज मठापासून चाकण चौकातून मिरवणूक सुरू झाली. स्वामी महाराज यांचे पुजारी श्रीक्षेत्रोपाध्ये मुकुंद गांधी परिवारातर्फे पूजा करण्यात आली. घुंडरे-पाटील परिवारातील गृहिणींनी सर्व बैलजोड्यांची पूजा करून औक्षण केले. माऊली मंदिराच्या महाद्वारासमोर यावर्षी बैलजोडी घेऊन येण्यासाठी आवश्यक असताना याबाबतच्या नियोजनाचा अभाव राहिला.

आळंदी देवस्थानने पालखी रथाच्या देखभाल दुरुस्तीचे कामदेखील सुरू केले असून, ट्रक्टर लावून पालखी रथाची चाचणी घेतली आहे. आता बैलजोड्या आळंदीत दाखल झाल्या असून, त्याना जुंपून रथाची चाचणी घेतली जाणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;