सायकल वारीला उत्स्फूर्त प्रतिसाद

सायकल वारीला उत्स्फूर्त प्रतिसाद

पर्यावरण आणि आरोग्याचा संदेश देणाऱ्या ‘सायकल वारी’ला राज्यभरातून वाढता प्रतिसाद मिळत असून, यंदाच्या आषाढीला सुमारे तीन हजार आबालवृद्ध सायकलिष्ट वारकरी सहभागी होणार आहेत. आयपीएस पोलीस अधिकारी हरीश बैजल यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या ‘सायकल वारी’चे हे तेरावे वर्ष आहे.

बैजल यांनी 2012 मध्ये नाशिक ते पंढरपूर अशी सायकल वारी सुरू केली होती. बैजल यांची आई श्री विठ्ठलाची भक्त होती. त्यामुळे तिच्या पश्चात तिचे स्मरण म्हणून सुरू झालेल्या या सायकल वारीला राज्यभरातील सायकलिस्टकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दरवर्षी एका जिह्याकडे या ‘सायकल वारी’चे यजमानपद दिले जाते. यावर्षी ‘लातूर सायकलिस्ट’ने सर्व जबाबदारी घेतली आहे.

यावर्षी राज्यभरातून 70 सायकल क्लबमधील तीन हजार सायकलिस्ट येत्या 20 जून रोजी पंढरीकडे प्रस्थान ठेवणार आहेत. 22 जून रोजी नगरप्रदक्षिणा आणि रिंगण सोहळा करून या वारीची सांगता होणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;