साई संस्थानच्या दक्षिणा पेटीतील दीड लाख लंपास, शिपायावर शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

साई संस्थानच्या दक्षिणा पेटीतील दीड लाख लंपास, शिपायावर शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

संस्थानच्या दक्षिणा पेटीतील रकमेची मोजदाद सुरू असताना लेखा शाखेतील शिपायाने हातचलाखीने दीड लाख रुपये लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

बाळासाहेब गोंदकर (रा. शिर्डी) असे गुन्हा दाखल झालेल्या शिपायाचे नाव आहे. प्रभारी लेखाधिकारी अविनाश विनायक कुलकर्णी यांनी याबाबत फिर्याद दिली. साईसमाधी मंदिर व मंदिर परिसरातील दक्षिणा पेट्यांतील दानांची मोजणी आठवड्यातून दोनदा केली जाते. लेखा विभागातील अधिकारी तसेच कायम व कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून ही मोजदाद करण्यात येते. 16 एप्रिल रोजी दक्षिणा पेटीतील दानाची मोजणी सुरू होती. मोजणी पूर्ण झाल्यानंतर बँक अधिकाऱ्यांचे हिशेबाचे कामकाज सुरू होते. त्या वेळी भिंतीजवळच्या नोटा मोजणी मशिनमध्ये 500 रुपयांच्या नोटांचे बंडल सुरक्षारक्षक विकास ओहोळ यांना दिसले. नजरचुकीने राहिले असेल असे प्रथमदर्शनी वाटल्याने ते बंडल ओहोळ यांनी रोखपालाच्या ताब्यात दिले. पुढच्या 25 एप्रिलच्या मोजणीवेळी पुन्हा तसाच प्रकार समोर आला.

लेखा शाखेतील कर्मचारी बाळासाहेब सोनवणे यांना यूपीएस व नोटा मोजणी मशिनमध्ये पुन्हा 500 रुपयांचे बंडल आढळून आले. ही बाब प्रभारी लेखाधिकाऱ्यांना कळविण्यात आल्यानंतर सलग तीन वेळा झालेल्या प्रकारामुळे त्यांना संशय आला. लेखाधिकाऱ्यांनी दक्षिणा मोजणी कक्षातील सीसीटीव्ही फुटेज मागवून तपासणी केली. या फुटेजमध्ये बाळासाहेब गोंदकर हा दक्षिणा मोजणी कामकाजावेळी चोरी करण्याच्या उद्देशाने नोटा लपविताना दिसून आला. मांडीखाली व नंतर पोटाजवळ पॅन्टीत लपविलेली रक्कम बाजूला कोपऱ्यात टाकून दुसऱ्या दिवशी स्वच्छता किंवा इतर बहाण्याने ती चोरी करत असल्याचे दिसले. मोजणीच्या तीन वेळेला सुमारे दीड लाख रुपयांची रक्कम गोंदकर याने चोरून नेल्याचे समोर आले.

तीन वेळा चोरी केल्याचे उघड
दक्षिणा पेटीतील नोटांच्या विभागणीचे काम करताना कोणाला कळणार नाही याची काळजी घेत गोंदकर हा पाचशे रुपयांचे बंडल सुरुवातीला मांडीखाली लपवून ठेवत होता. त्यानंतर पोटाजवळ पॅन्टीत लपवी. तेथून तो दक्षिणा मोजणी हॉलमधील नोटा व क्वॉईन चाळणीमध्ये किंवा तेथील क्रेटच्या थप्पीत लपवत असे. मोजणी कक्षाची साफसफाई करण्याच्या निमित्ताने दुसऱ्या दिवशी प्रवेश करून दडविलेली रक्कम चोरून नेत असे. 4, 8 आणि 11 एप्रिल अशा तीन मोजणीवेळी त्याने अशाप्रकारे चोरी केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले.

पाच वेळच्या मोजणीचे फुटेज तपासले
संस्थानने एप्रिलमधील 4, 8, 10, 11 आणि 12 या तारखांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. मुख्य लेखाधिकारी मंगल वराडे, मुख्य रोखपाल विश्वनाथ बजाज, प्रभारी लेखाधिकारी अविनाश अदलिंग यांनी फुटेजची पाहणी केली असता त्यात बाळासाहेब गोंदकर हा चोरीच्या उद्देशाने नोटा लपवीत असल्याचे दिसले. त्यानंतर पोलिसांत तक्रार देण्यात आली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;