काही गोष्टी बोलायच्या नसतात; कोकाटेंना कानपिचक्या

काही गोष्टी बोलायच्या नसतात; कोकाटेंना कानपिचक्या

राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून होणाऱ्या बेछूट वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. सगळ्याच गोष्टी बोलून कशाला दाखवायच्या. काही गोष्टी मनात ठेवायच्या असतात, अशा कानपिचक्या त्यांनी कोकाटेंना दिल्या. माणिकराव कोकाटे यांना अजून मनात ठेवायची सवय नाही. मात्र हे वक्तव्य फार महागात पडत असून मला ते फार जास्त महागात पडत आहे. कृषिमंत्री पद हे ओसाड गावची पाटीलकी आहे. तरीसुद्धा चांगलं काम करता येऊ शकतं हे सुद्धा उदाहरण आपल्याला राज्यात द्यायचं आहे, असे वक्तव्य केले.

…तर शस्त्र परवाना रद्द होईल

पुणे शहरामध्ये 2021 ते 2023 च्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रांचे परवाने देण्यात आले याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, त्यांच्याकडे शस्त्र परावाने आहेत त्या सर्वांची आता आगामी काळामध्ये चौकशी करण्यात येणार आहे. यामध्ये ज्यांना खरंच शस्त्र-परवान्याची आवश्यकता आहे अशांचे शस्त्र परवाने हे कायम ठेवण्यात येणार असून ज्यांना शस्त्र परवान्याची आवश्यकता नाही, अशांचे शस्त्र परवाने रद्द करण्याची कारवाई देखील करण्यात येणार आहे.

अपात्र लाडक्या बहिणींकडून वसुली नाही

लाडकी बहीण योजनेचा लाभ अनेक सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतल्याचे समोर आले आहे. याबाबत अजित पवार म्हणाले, ‘लाडकी बहीण’ योजनेतर्गत आपण जे यासाठी पात्र नाहीत त्यांनी अर्ज करू नका असे आवाहन केले होते. मात्र तसे झाले नाही, ज्यांना पैसे देण्यात आले आहेत त्यांचे पैसे आता आपण परत घेऊ शकत नाही. मात्र, यापुढे पात्र लाभार्थ्यांनाच मोबदला देण्याचा आमचा प्रयत्न आहे. कशाला त्यांच्यावर कारवाई करायला लावता. चुकले असेल त्यांचे असे म्हणत अजित पवारांनी त्या सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;