शहरवासीयांनो, खड्डयांची तक्रार नोंदवा अ‍ॅपवर; महापालिकेकडून खड्डे व्यवस्थापन प्रणाली विकसित

शहरवासीयांनो, खड्डयांची तक्रार नोंदवा अ‍ॅपवर; महापालिकेकडून खड्डे व्यवस्थापन प्रणाली विकसित

महापालिकेने खड्डे व्यवस्थापन प्रणाली विकसित केली असून, मान्सूनच्या पार्श्वभूमीवर ती सुरू करण्यात येणार आहे. ‘पॉटहोल मॅनेजमेंट’ हे नावीन्यपूर्ण अ‍ॅप विकसित करण्यात आले असून, नागरिकांना या अ‍ॅपद्वारे खड्यांची तक्रार नोंदवता येणार आहे, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली.

महापालिकेची मान्सूनपूर्व तयारी सुरू आहे. पावसाळ्यामध्ये दरवर्षी शहरातील विविध भागांत मोठ्या प्रमाणात खड्डे पडत असतात. यासाठी महापालिकेने पॉटहोल अ‍ॅप विकसित केले आहे. या अ‍ॅपमुळे खड्ड्यांची तक्रार नोंदवणे आणि त्या तक्रारींचे निराकरण करण्याची प्रक्रिया सोपी व सुलभ होणार आहे. नागरिक या अ‍ॅपद्वारे खड्यांची तक्रार नोंदवू शकतात आणि त्या तक्रारींच्या निराकरणाविषयी अद्ययावत माहिती मिळणार आहे.

नागरिकांना अ‍ॅपद्वारे खड्यांची तक्रार नोंदवण्यासाठी प्रथम पॉटहोल अ‍ॅपमध्ये लॉगिन करावे लागणार आहे. त्यानंतर नागरिक खड्ड्यांचे फोटो काढून त्याच्या स्थानासह (Geo Location) ते अपलोड करू शकतात. ही माहिती आपोआप संबंधित
विभागातील कनिष्ठ अभियंत्यांना त्यांच्या प्रभागानुसार पाठवली जाईल. याचवेळी ती माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही पाठवली जाईल. तक्रार नोंदवल्यानंतर तिचे निराकरण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याकडे दिली जाईल. तक्रारीचे निराकरण न झाल्यास त्या भागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना ई-मेल व संदेश पाठवण्यात येईल.

तक्रारीचे निराकरण संबंधित विभाग किंवा अभियंता यांनी केल्यानंतर ती तक्रार अ‍ॅपमध्ये बंद केली जाईल आणि तक्रारदारास फोटोसह निराकरणाची माहिती ई-मेल, संदेशाद्वारे कळवली जाणार आहे.

मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा
Smart Sarathi PCMC Mobile Application मोबाईलवर Google Play Store, Apple App Store वरून डाऊनलोड करा, अ‍ॅपमध्ये PCMC Services विभागात जाऊन “Report Pothole App निवडा. अ‍ॅप स्टोअरमध्ये “PCMC Pothole Management” असे शोधून अ‍ॅप डाऊनलोड करता येईल, युजरनेम आणि पासवर्ड टाकून पूर्ण नाव, मोबाईल नंबर व ई-मेल आयडी, Send OTP” या बटणावर क्लिक करा आणि ईमेलवर आलेला OTP टाकून नोंदणी पूर्ण करा.

शहरातील रस्ते खड्डेमुक्त असावेत, यासाठी महापालिका सातत्याने प्रयत्नशील आहे. रस्त्यांवरील खड्यांची तक्रार नागरिकांना सहज करता यावी, यासाठी खड्डे व्यवस्थापन प्रणाली सुरू करण्यात येत आहे. रस्ते अधिक सुरक्षित व सुरळीत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. – शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक

तक्रार कशी करावी आणि ट्रॅकिंग कशी करावी?
मोबाईलमध्ये लोकेशन सर्व्हिसेस ऑन करा, “Zoom GPS Location” वर क्लिक करून सध्याचे लोकेशन पाहा आणि नकाशावर खड्याचे स्थान निवडा व जवळचा ओळखण्याजोगा पत्ता, संदर्भ द्या. समस्या प्रकार निवडा (उदा. कमी खोल खड्डा, खोल खड्डा, चेंबर डॅमेज, युटिलिटी ट्रेच डॅमेज, इ.), अंदाजे लांबी व रुंदी (मीटरमध्ये) प्रविष्ट करा, खड्यांचे स्पष्ट फोटो अपलोड करा आणि तक्रार सबमिट करा. आपल्याला एक युनिक तक्रार क्रमांक दिला जाईल, ई-मेलद्वारे ट्रॅकिंग लिंकसह पुष्टीकरण मिळेल. ही तक्रार संबंधित पालिकेच्या अभियंत्याकडे पाठवली जाईल, जे योग्य ती कारवाई करतील किंवा ती दुसऱ्या संबंधित विभागाकडे पाठवतील. काम पूर्ण झाल्यानंतरचा फोटो व काम पूर्ण झाल्याचा अहवाल आपल्या नोंदणीकृत ई-मेलवर पाठवला जाणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

नॉनस्टिक पॅन वापरताना ‘ही’ चूक करू नका, नाहीतर आरोग्यावर होईल घातक परिणाम नॉनस्टिक पॅन वापरताना ‘ही’ चूक करू नका, नाहीतर आरोग्यावर होईल घातक परिणाम
आजच्या धावपळीच्या जीवनात स्वयंपाकात वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी नॉनस्टिक भांडी मोठ्या प्रमाणात वापरली जात आहेत. कमी तेलात झटपट शिजणारे पदार्थ...
टॅनिंगशी संबंधित या पाच मिथकांवर लोक ठेवतात सहज विश्वास, कोणते आहेत ते जाणून घेऊयात
Air India Plane Crash – अपघाताच्या तिसऱ्या दिवशी विमानात सापडला एक मृतदेह, ढिगारा उपसण्याचे काम सुरूच
Air India Plane Crash – विमान अपघातात मृत्यू झालेल्या मेडिकल विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना 1 कोटीची मदत देणार, टाटा समूहाचा निर्णय
बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन सातव्या दिवशी मागे, सरकारला 2 ऑक्टोबरपर्यंतचा अल्टिमेटम
इस्रायल आणि इराणमध्ये युद्धाचा भडका उडताच आकाशात विमानांचे ट्रॅफिक जॅम, जगभरातील एअरलाईन्सनी बदलले मार्ग
मंत्र्यांच्या चेहऱ्यावर दु:खाचा लवलेशही नाही, मृत्युच्या ढिगाऱ्यावर उभे राहून रील बनवत बसले; संजय राऊत कडाडले