राज्याचा महिला आयोग पक्षपाती! अध्यक्षांनी स्वतःहून राजीनामा द्यावा

राज्याचा महिला आयोग पक्षपाती! अध्यक्षांनी स्वतःहून राजीनामा द्यावा

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राजकीय वलय असलेल्या व्यक्तीची नियुक्ती करणे चुकीचे आहे हे आता स्पष्ट झाले आहे. गेल्या काही प्रकरणात आयोगाच्या अध्यक्षांची भूमिका पक्षपातीपणाची दिसून आली. पक्षाचा एक विभाग असल्यासारखे आयोगाचे काम कोणी चालवित असेल तर लोकांना न्याय मिळणार नाही. लोकांच्या आग्रहास्तव महिला आयोगाच्या अध्यक्षांनी स्वतःहून राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेनंतर ते बोलत होते. वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्येनंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर चौफेर टीका झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर बोलताना रोहित पवार म्हणाले, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राजकीय व्यक्तीची नियुक्ती करता कामा नये. या पदावर निवृत्त न्यायाधीश, निवृत्त पोलीस अधिकारी आदी क्षेत्रांतील व्यक्तींची नियुक्ती झाली पाहिजे. विधानसभेच्या पुढील अधिवेशनात याबाबत विषय उपस्थित करणार आहोत, असे रोहित पवार यांनी सांगितले.

आम्ही पत्र दिल्याची माहिती खोटी!

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यासंदर्भात चर्चा सुरू असताना मी आणि जयंत पाटील यांनी शरद पवार यांना पत्र दिल्याची माहिती खोटी आहे. आमच्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी याविषयीचा निर्णय घेण्याची जबाबदारी पक्षाच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे दिली आहे. सध्या त्या देशाची भूमिका मांडण्यासाठी परदेश दौऱ्यावर आहेत. 5 जूननंतर त्या मायदेशात परततील. त्यानंतरच याबाबतचा निर्णय त्या घेतील, असे रोहित पवार म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;