‘डेक्कन क्वीन’ झाली 95 वर्षांची! आज गौरवशाली 96 व्या वर्षांच्या सेवेत पदार्पण करणार

‘डेक्कन क्वीन’ झाली 95 वर्षांची! आज गौरवशाली 96 व्या वर्षांच्या सेवेत पदार्पण करणार

मध्य रेल्वेच्या सर्वात प्रतिष्ठत व लोकप्रिय ट्रेनपैकी एक असलेल्या ‘डेक्कन क्वीन’च्या सेवेला 95 वर्षे पूर्ण झाली आहेत. येत्या 1 जूनला ही राणी तिच्या गौरवशाली 96 व्या वर्षांच्या सेवेत पदार्पण करणार आहे. 1 जून 1930 रोजी मुंबई आणि पुणे या दोन शहरांच्या सेवेत दाखल झालेली ‘डेक्कन क्वीन’ ही ट्रेन मध्य रेल्वेच्या अग्रदूत असलेल्या ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा होता. दोन महत्त्वाच्या शहरांना सेवा देणारी ही पहिली डिलक्स ट्रेन होती. त्यावरूनच तिला ‘डेक्कन क्वीन’ असे नाव देण्यात आले.

ही ट्रेन सुरुवातीला सात डब्यांसह दोन रेकसह सेवेत दाखल करण्यात आली होती. त्यापैकी एक रेक चांदीच्या रंगात लाल मोल्डिंगसह रंगवण्यात आला होता, तर दुसरा रेक रॉयल ब्ल्यू रंगात सोनेरी रेषेने रंगवला होता. मूळ रेकच्या डब्यांचे अंडरफ्रेम्स इंग्लंडमध्ये बनवले होते, तर कोच बॉडी जीआयपी रेल्वेच्या माटुंगा कार्यशाळेमध्ये बनवण्यात आली होती. मूळ रेकचे डबे 1966 मध्ये पेरांबूर येथील इंटिग्रल कोच फॅक्टरीद्वारे निर्मित अ‍ॅण्टी-टेलिस्कोपिक स्टील बॉडी असलेल्या इंटिग्रल कोचने बदलण्यात आले. ही ट्रेन मुंबईकर आणि पुणेकरांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. त्यामुळे तिच्या 96 व्या वर्षातील पदार्पणामुळे प्रवासीवर्गातून आनंद व्यक्त केला जात आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;