वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरण – शस्त्र परवान्यासाठी हगवणे बंधूंकडून बनावट कागदपत्रे

वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरण – शस्त्र परवान्यासाठी हगवणे बंधूंकडून बनावट कागदपत्रे

बनावट कागदपत्रे सादर करून शस्त्र परवाना मिळवल्याप्रकरणी हगवणे बंधूंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शस्त्र परवाना मिळविण्यासाठी दोघा भावडांनी पुणे पोलिसांकडे बनावट कागदपत्रे सादर केली होती. त्यानुसार शशांक हगवणे आणि सुशील हगवणेविरोधात वारजे आणि कोथरूड पोलीस ठाण्यात फसवणुकीचे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. सासरच्या छळाला कंटाळून वैष्णवी हगवणे यांनी आत्महत्या केली आहे. त्यानंतर हगवणे बंधूंविरोधात दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी कोथरूड आणि वारजे पोलीस ठाण्यातील पोलिसांनी फिर्याद दिली आहे.

हगवणे बंधूंनी शस्त्र परवाने मिळवण्यासाठी आवश्यक असलेली पार्श्वभूमी तपासणी प्रक्रियेत खोटी माहिती स्थानिक पोलिसांना दिली होती. खोट्या माहितीनंतर त्याला शस्त्र परवाना मिळाला होता. शस्त्र परवाना मिळवताना दोघांनी दिलेल्या माहितीत विसंगती आढळल्याचा संशय पोलिसांना होता. त्यानंतर माहितीची शहानिशा केली. कागदपत्रांची पडताळणी करण्यात आल्यानंतर गुन्हा दाखल केला. शशांक राजेंद्र हगवणे याने स्वसंरक्षणार्थ शस्त्र परवाना मिळविण्यासाठी कर्वेनगरमध्ये 10 वर्षांपासून राहत असल्याची बनावट कागदपत्रे सादर केली होती. तपासाअंती संबंधित शशांक हा त्याठिकाणी राहत नसल्याचे स्पष्ट झाले.

शस्त्र परवाना मिळविण्यासाठी सुशील हगवणे यानेही आपण कोथरूडमधील पौड रस्ता परिसरात राहत असल्याची कागदपत्रे सप्टेंबर 2022 ते मे 2023 कालावधीत कोथरूड पोलिसांना सादर केली होती. कागदपत्रांच्या आधारे पोलिसांनी तपासणी केली असता, आरोपी सुशील हगवणे त्या पत्त्यावर राहत नसल्याचे उघडकीस आले. शस्त्र परवान्यासाठी खोटी माहितीसह खोटा पुरावा सादर करून सुशीलने पोलिसांची दिशाभूल केली. दरम्यान, तत्कालीन अपर आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर यांनी संबंधितांच्या शस्त्र परवान्यावर सही केली होती.

दोघांचा शस्त्र परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू
शशांक, दीर सुशील हगवणे तसेच नीलेश चव्हाण यांनी 2022 मध्ये पुणे पोलिसांकडून शस्त्र परवाना मिळविला होता. तिघांचे पिस्तूल जप्त केले असून, त्यांचा शस्त्र परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे. शशांक आणि सुशील हगवणे यांनी पुणे पोलिसांकडून शस्त्र परवाना मिळवण्यासाठी पुण्यातील निवासाचा पत्ता दिला. या दोघांनी वारजे आणि कोथरूड पोलीस ठाण्यात शस्त्र परवाना मिळवण्यासाठी अर्ज केले होते. वास्तव्याचा पुरावा म्हणून दोघांनी भाडेकरार पोलिसांना दिल्याचे चौकशीत उघडकीस आले आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

IMD Weather Update :  प्रचंड वेगानं येतंय नवं संकट, 20 राज्यांना हाय अलर्ट, महाराष्ट्राबाबत मोठी बातमी IMD Weather Update : प्रचंड वेगानं येतंय नवं संकट, 20 राज्यांना हाय अलर्ट, महाराष्ट्राबाबत मोठी बातमी
यंदा देशासह राज्यात वेळेआधीच मान्सूनचं आगमन झालं आहे, मान्सून तब्बल 12 दिवस आधीच महाराष्ट्रात दाखल झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून...
मुंबापुरीच्या सागरात अक्रित घडणार, समुद्रात येणार…नेमका इशारा काय?
टीव्ही मालिकांतील या 7 सुंदर कजाग सासवा पाहा, सुनांच्याही वरचढ त्यांचे ग्लॅमर !
‘क्योंकी सास भी कभी बहू थी 2’च्या एका एपिसोडसाठी स्मृती इराणी किती पैसे घेते माहितीये का? ऐकून बसेल धक्का
वयाच्या 15व्या वर्षी गुपचूप रेड लाइट एरियात जायची ही अभिनेत्री, शूट केला अश्लील सीन; 4 वर्षांत सोडलं बॉलिवूड
Kolhapur News – आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे…; गीत गातच माजी शिक्षकाने घेतला शेवटचा श्वास,
Jalna News – धुळे सोलापूर महामार्गावर इनोव्हा गाडीला अपघात, एक जागीच ठार; एक गंभीर जखमी