पुणे पालिकेचा 66 कोटींचा कचरा प्रकल्प वादात! जागा निश्चित नाही; निविदाही संशयाच्या भोवऱ्यात

पुणे पालिकेचा 66 कोटींचा कचरा प्रकल्प वादात! जागा निश्चित नाही; निविदाही संशयाच्या भोवऱ्यात

पुणे महापालिकेच्या रामटेकडी येथील नियोजित 66 कोटी 8 लाख रुपयांचा कचरा प्रक्रिया प्रकल्प सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अद्याप प्रकल्पासाठी निश्चित जागा मिळालेली नसताना आणि निविदा प्रक्रियेत पुरेशी स्पर्धा न झाल्याचा आरोप होत असताना, स्थायी समितीकडून हा प्रस्ताव घाईगडबडीत मंजूर करण्यात आला. त्यामुळे या प्रकल्पावर संशयाचे मळभ निर्माण झाले आहे.

शहरातील मोकळ्या जागांमध्ये गाद्या, सोफा, कपडे, फर्निचर, लेदर यासारख्या कचऱ्याचा साठा वाढत चालला आहे. या प्रकारच्या कचऱ्याची प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने ७५ टन क्षमतेचा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पासाठी ‘ग्रीन पृथ्वी सोल्युशन एलएलपी, पुणे’ या कंपनीला १५ वर्षांसाठी काम देण्यात येणार असून, त्यांना प्रकल्पासाठी सुरुवातीला 13.03 कोटी रुपये मिळणार आहेत. पुढील काळात 15 वर्षांसाठी एकूण 66.08 कोटी रुपयांचा खर्च महापालिका करणार आहे.

या कचऱ्याची वाहतूक आणि प्रक्रिया करण्यासाठी प्रतिटन ६९० रुपये वाहतूक खर्च महापालिका ठेकेदाराला देणार आहे. विशेष बाब म्हणजे, या महत्त्वाच्या प्रस्तावास बुधवारी रात्री उशिरा स्थायी समितीत मंजुरी मिळाली.

दरम्यान, घनकचरा विभागाने यासाठी सूस रस्ता, बाणेर येथे जागा निवडली होती. मात्र, स्थानिक विरोधाच्या शक्यतेमुळे रामटेकडी येथील एक एकर जागेसाठी नवीन प्रस्ताव आयुक्तांकडे पाठवण्यात आला. मात्र, तो अद्याप मंजूर झालेला नाही. जागेची निश्चिती झालेली नसतानाही प्रस्ताव कसा मंजूर झाला, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

निविदेवरही ताशेरे
माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि प्रशांत बधे यांनी या निविदा प्रक्रियेमध्ये पारदर्शकतेचा अभाव असल्याचे म्हटले आहे. केवळ दोन निविदा आल्यावरही फेरनिविदा न काढल्याबद्दल त्यांनी आक्षेप घेतले. शिवाय स्थापत्य कामांसाठी नमूद केलेल्या ११ कोटींच्या खर्चाचा कोणताही तपशील नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणले आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;