अजित पवार गटाच्या दीपक मानकर यांच्यामुलाविरुद्धही गुन्हा दाखल

अजित पवार गटाच्या दीपक मानकर यांच्यामुलाविरुद्धही गुन्हा दाखल

बनावट कागदपत्रे सादर करून पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी अजित पवार गटाच्या दीपक मानकर यांच्या विरोधात समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आता त्यांचा मुलगा करण मानकर आणि व्याही सुखेन शहा यांच्याविरुद्धही समर्थ पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. बलात्कारातील आरोपी शंतनू कुकडेसोबतचे असलेले कोटय़वधींचे आर्थिक व्यवहार लपविल्याप्रकरणी आणि पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी मानकरसह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

विदेशी तरुणीला आश्रय देण्याच्या बहाण्याने तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी शंतनू कुकडे याच्यावर गुन्हा दाखल आहे. त्याच्या बँक खात्यात तब्बल 100 कोटी रुपयांचे व्यवहार झाले होते. कुकडेचा निकटवर्तीय रौनक जैन याच्या बँक खात्यातून मानकर पिता-पुत्रांच्या बँक खात्यात कोटय़वधी रुपये वर्ग केले आहेत. त्याअनुषंगाने पुणे पोलिसांनी मानकर यांची नुकतीच चौकशी केली होती. मानकर यांनी कुकडेसोबत कोणतेही आर्थिक व्यवहार झाले नसल्याचे सांगत कागदपत्रे सादर केली होती. पोलिसांनी कागदपत्रांची सत्यता तपासली असता, कागदपत्रे बनावट असल्याची आढळली. आर्थिंक व्यवहार लपविण्यासाठी बनावट कागदपत्रांद्वारे करण मानकर यानेही पोलिसांनी दिशाभूल केली आहे. त्यांच्याही बँक खात्यात 50 लाख रुपये वर्ग झाले आहेत. याप्रकरणी शंतनू कुकडे, करण मानकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;