पीटी फॉर्म भरूनही 40% सवलत मिळेना! मिळकतधारकांचा संताप

पीटी फॉर्म भरूनही 40% सवलत मिळेना! मिळकतधारकांचा संताप

महापालिकेच्या मिळकतकर विभागातील गोंधळ काही थांबत नाही. पीटी 3 फॉर्म भरून दिलेल्या मिळकतदारांना अद्यापही चाळीस टक्के सवलत दिली जात नाही. पीटी 3 फॉर्म हा मिळकत करधारकांच्या मुळावर आलेला आहे. पीटी ३ फॉर्मची गरज नसताना, प्रशासनाच्या फायद्यासाठी हा फॉर्म तत्कालीन कर आकारणी आणि कर संकलनप्रमुख यांनी लादला. महापालिकेकडे सर्व रेकॉर्ड अद्ययावत आहे. या फॉर्मची गरज नाही. हा फॉर्म म्हणजे एक कुरण होते व आहे, असा आरोप करून आपली संस्था, आपला परिसर संस्था आणि नागरी हक्क समितीने संताप व्यक्त केला आहे. चुकीच्या पद्धतीने झालेल्या अर्ज नोंदणीचा फटकाही मिळकतदारांना बसत आहे.

महापालिकेच्या मिळकत विभागाशी संबंधित तक्रारींवर आपले पुणे, आपला परिसर, नागरी हक्क संस्था यांच्या वतीने माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे महापालिकेतील माजी नगरसेवक प्रशांत बधे, सुहास कुलकर्णी, काका कुलकर्णी यांनी मिळकत कर विभागाची सुत्रे नुकतीच हाती घेतलेले अविनाश सपकाळ यांची भेट घेत मिळकतकराच्या तक्रारींवर चर्चा केली. यावेळी सहायक कर संकलन प्रमुख अस्मिता तांबे प्रशासकीय प्रमुख रवींद्र ढावरे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

निवासी मिळकतदार स्वतः राहत असलेल्या मिळकतीच्या करात चाळीस टक्के सवलत देण्यात येत आहे. राज्य सरकारने ही सवलत बंद केली होती. ती पुन्हा गेल्या वर्षी सुरू केली गेली. ही सवलत मिळविण्यासाठी मिळकतदारांना पीटी ३ फॉर्म भरून देणे बंधनकारक केले गेले. तसेच क्षेत्रीय कार्यालय स्तरावरही महापालिकेकडून मिळकतींचे सर्वेक्षण केले गेले होते. यामध्ये साडेतीन लाखांहून अधिक मिळकतींचा समावेश आहे. दरम्यान, ज्या मिळकतदारांचे नाव यादीत आहे, त्यांना ४० टक्के सवलत मिळेल. मात्र, त्यांनी पालिकेच्या विशेष कक्षातून आपले बिल दुरुस्त करून घ्यावे, असे आवाहन कर आकारणी व कर संकलन विभागाचे उपायुक्त अविनाश सपकाळ यांनी म्हटले आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;