ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट भरपाई द्या; शिवसेनेची मागणी

पंचनाम्याचे घोडे नाचवत बसू नका, ओला दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करून सरसकट हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई द्या, अशी मागणी शिवेसना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने सरकारकडे करण्यात आली आहे.

शिवसेना उपजिल्हाप्रमुख शाहूराव फरतडे यांनी या संबंधीचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. – या निवेदनावर माजी उपसरपंच विजय माने, माजी उपसरपंच अॅड. विकास जरांडे, माजी उपसरपंच उत्तम हनपुडे, शाखाप्रमुख भाऊ मस्तूद, बालाजी वाडेकर, शिवाजी नाईकनरे, शिवाजी लोंढे, अविनाश गाडे, बाळासाहेब पाटील आदींच्या सह्या आहेत. निवेदनात म्हटले आहे की, मे – महिन्यातच होत असलेल्या अवकाळी पावसामुळे करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाले आहे. कांदा, – फळभाज्या, केळी, डाळिंब, पेरू, भुईमूग यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

तर अनेक ठिकाणी वादळी वाऱ्याने घरांचे पत्रे, छप्पर उडून नुकसान झाले आहे. दुभत्या गायी, बैल, म्हशींसाठी अनेकांनी ओला चारा केला होता. सततच्या पावसाने त्याचेही नुकसान झाले असून, चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी पेरणीपूर्व मशागती केल्या होत्या. मात्र, सततच्या मूर पावसाने शेती चिबडूण गेली आहे. यामध्ये आता लव्हाळा, व इतर गवत वाढणार असल्याने ही जमीन पेरणीयोग्य करण्यासाठी पुन्हा शेतकऱ्यांना मशागत करावी लागणार आहे. त्यातच मान्सूनचे आगमन झाल्याने आता लवकर वापसा होणे अशक्य असल्याचे दिसत आहे. एकंदरीत सध्या ओला दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, पंचनाम्याचे घोडे न नाचवता शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख शाहूदादा फरतडे यांनी महसूल विभागाकडे केली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;