बेशिस्त वाहनचालकांवर ‘एआय’ची नजर

बेशिस्त वाहनचालकांवर ‘एआय’ची नजर

शहरातील बेशिस्त वाहनचालकांना वठणीवर आणण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी आता टेक्नोसॅव्ही मोहिमेची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यानुसार थेट आर्टिफिशल इंटेलिजन्स (एआय) कॅमेऱ्याद्वारे दंडात्मक कारवाई करीत नियमभंग करणाऱ्या चालकांना धडा शिकवला जात आहे. वर्दळीच्या फर्ग्युसन कॉलेज रोडवर हॉटेल वैशालीनजीक एआय कॅमेरे संचालित बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा शुभारंभ पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे, एसीपी विवेक पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशा निंबाळकर उपस्थित होत्या. पहिल्याच दिवशी अवघ्या तीन तासांत १८० बेशिस्त चालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली आहे.

शहरातील वाहतूक सुधारणासाठी नावीन्यपूर्ण बदलासह अत्याधुनिक मोहिमेची अंमलबजावणी वाहतूक विभागाकडून केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता आर्टिफिशल इंटेलिजन्सचा वापर वाहतूक शाखेने सुरू केला असून, फर्ग्युसन कॉलेज रोडवरील ए आय कॅमेऱ्याच्या माध्यमातून नो पार्किंग, वाहतुकीस अडथळा करणाऱ्या डबल पार्किंगसह इतर नियमभंग करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. पुणे शहरात प्रायोगिक तत्त्वावर चाचणी स्वरूपात याची अंमलबजावणी सुरू केली आहे. आगामी काही दिवसांत टिळक रस्ता, जंगली महाराज रोड, शिवाजी रोड, महात्मा गांधी रस्ता, यांसह महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या ठिकाणी आर्टिफिशल इंटेलिजन्स कॅमेरे बसवून बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी सांगितले.

पुणे वाहतूक विभाग आणि सेनसेन ए. आय. कंपनीचे विजय खुस्पे यांच्या संयुक्त विद्यमानाने ए. आय. आधारित वाहतूक उल्लंघन शोध व अंमलबजावणी प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला. नो पार्किंग ठिकाणी लावलेली वाहने, ३ मिनिटांपेक्षा जास्त मुख्य रस्त्यावरती अडथळा करीत असल्यास कॅमेऱ्यात टिपली जात आहेत. त्यानंतर संबंधित प्रणालीच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई केली जात आहे. संबंधित चालकांवर वाहतूक शाखेच्या वतीने सीसीटीव्ही चलन अपलोड केले जात आहे. त्यासोबत नियमभंग करणाऱ्या वाहनांची नंबर प्लेट पडताळणी करीत कारवाई केली जात आहे.

वाहनचालकास सिस्टिमची माहिती व्हावी म्हणून फग्र्युसन कॉलेज रोडवरती स्क्रीनच्या माध्यमातून जनजागृतीवर भर दिला आहे. अत्याधुनिक यंत्रणेद्वारे वाहतूक नियमनाबरोबर जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान, भविष्यात पुणे शहरातील वेगवेगळ्या ठिकाणांसह महत्त्वाच्या रस्त्यावर ए. आय. आधारित वाहतूक उल्लंघन शोध व अंमलबजावणी प्रणालीचा वापर केला जाणार आहे. तसेच पहिल्याच दिवशी तब्बल 180 बेशिस्त वाहनचालकांना कारवाईचा दणका दिला असून, त्यापैकी काहीजणांकडून दंडवसुली करण्यात आली आहे. नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

आर्टिफिशल इंटेलिजन्स प्रणालीद्वारे बेशिस्त वाहनचालकांना कॅमेऱ्यात टिपून दंडात्मक कारवाईचा शुभारंभ केला आहे. शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासह मध्यवर्ती फग्र्युसन रस्ता, जंगली महाराज रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, महात्मा गांधी रस्त्यांसह विविध ठिकाणे आदर्शवत करण्यासाठी आम्ही प्राधान्य दिले आहे. त्यासाठी नागरिकांचे मोठे सहकार्य अपेक्षित असून, वाहतूक नियमांचे पालन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.

अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींची लॉटरी लागणार? योजनेबाबत मोठ्या निर्णयाची शक्यता Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींची लॉटरी लागणार? योजनेबाबत मोठ्या निर्णयाची शक्यता
ज्या कुटुंबाचं उत्पन्न हे  अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे....
खुशखबर ! मुंबई-कोकण आता अवघ्या चार तासात, कसं? मग ही बातमी वाचाच..
लग्नाआधी प्रेग्नंट राहिलेली ही बॉलिवूड अभिनेत्री आता दुसऱ्यांदाही होणार आई, म्हणाली ‘आता आरामाची गरज…’
IPL मधून प्रिती झिंटा किती कमावते? तिची एकूण संपत्ती किती?
ही प्रसिद्ध अभिनेत्री नाना पाटेकरांची पूर्वपत्नी, ‘छावा’मधून जबरदस्त कमबॅक
‘आई तुळजाभवानी’चं कथानक अत्यंत रंजक वळणावर; सटवाई लिहिणार देवीचं भविष्य
बॅकलेस रेड ड्रेस अन् दिसला तो टॅटू, मलायकाच्या नव्या फोटोंची तुफान चर्चा!