नवऱ्याने बायकोला चार कानाखाली मारल्या म्हणजे छळ होत नाही! हगवणेच्या वकिलाचा अजब दावा; वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न

नवऱ्याने बायकोला चार कानाखाली मारल्या म्हणजे छळ होत नाही! हगवणेच्या वकिलाचा अजब दावा; वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न

नवऱ्याने बायकोला चार कानाखाली मारल्या म्हणजे छळ होत नाही. प्लास्टिकच्या छडीला हत्यार म्हणायचे का? असा अजब युक्तीवाद हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी आज न्यायालयात केला. तसेच यावेळी वकिलांनी भरकोर्टात वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, न्यायालयाने वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणी सासरा आणि दिराला आणखी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली तर, पती, सासू आणि नणंदेच्या पोलीस कोठडीत एक दिवसांची वाढ केली.

दोन कोटी रुपयांच्या हुंडय़ासाठी मानसिक आणि शारिरीक छळ केल्यामुळे वैष्णवी हगवणे या विवाहितेने आत्महत्या केली. हुंडाबळीच्या या घटनेने राज्यभरात संतापाची लाट उसळली. वैष्णवीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटकेत असलेला पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे, नणंद करिश्मा हगवणे, सासरा राजेंद्र हगवणे आणि दिर सुशील हगवणे यांच्या पोलीस कोठडीची मुदत बुधवारी संपली. त्यामुळे पोलिसांनी पाचही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले होते.

आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद

सोन्याबाबतची सर्व माहिती यापूर्वीच आरोपींनी स्वतःहून पोलिसांना दिली आहे. व्यवसाय करण्यासाठी पुटुंबातील सर्वांचे सोने गहाण ठेवले होते. आपले सोने काढून घेतल्याची तक्रार वैष्णवीने केलेली नाही. वैष्णवीचे एका तरुणासोबतचे चॅटिंग पती शशांक यांना मिळाले होते. त्यातून त्यांच्यात वाद झाले होते, याबाबत तपास पोलिसांनी केलेला नाही. 18 तारखेला त्या मुलाचा साखरपुडा झाला. त्यासाठी ती काॅल करत होती असे सांगतानाच आरोपीच्या वकिलांनी पतीने पत्नीच्या चार कानाखाली मारणे म्हणजे छळ नाही. प्लास्टिकच्या छडीला हत्यार म्हणायचं का? असा अजब सवाल आरोपीचे वकील अॅड. विपुल दुशिंग यांनी केला.

सरकारी वकिलांचा युक्तिवाद

वैष्णवी हगवणेची सासू, नणंद आणि दीर या तिघांचे मोबाईल या गुह्यातील फरार आरोपी नीलेश चव्हाण याने लंपास केले आहेत. या मोबाईलमध्ये वैष्णवी यांना मारहाण केल्याचे आणि आरोपींमध्ये संभाषणाचे पुरावे असू शकतात. नीलेशचा आणि मोबाईलचा शोध सुरू आहे. चव्हाण व सुशिल हगवणे यांच्यामधील गुह्याच्या अनुषंगाने झालेले चॅट, मेसेजस हे पुराव्यासाठी जप्त करण्यात येत आहेत. वैष्णवी यांचा मृत्यू होण्यापूर्वी शशांक याने वैष्णवीला तीन दिवस आधी वेगवेगळ्या हत्याराने मारहाण केली आहे. ते हत्यार जप्त करायचे आहेत. त्यामुळे शशांक, लता आणि करिष्मा हगवणे यांच्या पोलिस कोठडीचे हक्क अबाधित ठेवून एक दिवसांची तर राजेंद्र आणि सुशील यांच्या पोलिस कोठडीत सात दिवसांची वाढ करण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील नितीन अडागळे यांनी केला.

चॅट कोर्टासमोर का दिले नाही?

शशांक हगवणे याने वैष्णवीचे चॅटींग पकडले आहे. तर मग ते चॅट न्यायालयासमोर का दिले नाहीत? असा सवाल सरकारी वकिलांनी उपस्थित केला. वैष्णवीच्या शरीरावर जखमा आहेत. याचा तपास करायचा आहे. त्यासाठी आरोपींना पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी केली. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. पी. खंदारे यांनी आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ केली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;