समृद्धी महामार्गावर चार महिन्यांत 55 बळी; वेगवान प्रवासाची ‘नशा’ जिवावर बेततेय!

समृद्धी महामार्गावर चार महिन्यांत 55 बळी; वेगवान प्रवासाची ‘नशा’ जिवावर बेततेय!

मुंबई आणि नागपूरला जोडणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर वेगवान ड्रायव्हिंगची ‘नशा’ जीवघेण्या अपघातांना निमंत्रण देत आहे. मागील चार महिन्यांत या महामार्गावर 55 जणांचा अपघाती मृत्यू झाला. दुसरीकडे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर गेल्या चार महिन्यांत 10 अपघातांत 11 जणांचा मृत्यू झाला. महाराष्ट्र महामार्ग पोलिसांनी समृद्धी महामार्गात आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील प्राणघातक अपघातांची आकडेवारी जाहीर केली आहे.

जानेवारी ते एप्रिल या कालावधीत मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर दहा प्राणघातक अपघात झाले, त्यात 11 प्रवाशांचा मृत्यू झाला. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर 47 अपघातांची नोंद झाली. त्यात 55 जणांना जीव गमवावा लागला. समृद्धी महामार्गाच्या तुलनेत मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर कमी जीवितहानी झाली. इंटेलिजेंट ट्रैफिक मॅनेजमेंट सिस्टीममुळे (आयटीएमएस) मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील अपघातांची संख्या कमी झाल्याचा दावा अतिरिक्त वाहतूक आयुक्त भरत कळसकर यांनी केला.

‘आयटीएमएस’मुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर अपघातांचे प्रमाण कमी ‘आयटीएमएस’ प्रणालीमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर अपघातांचे प्रमाण कमी झाल्याचे परिवहन विभागाने म्हटले आहे. ‘आयटीएमएस’ अंतर्गत अतिवेगाने वाहन चालवणे, बेकायदेशीर पार्किंग, चुकीच्या पद्धतीने प्रवेश करणे, सीटबेल्टशिवाय वाहन चालवणे, गाडी चालवताना मोबाईल फोनचा वापर करणे, लेन कटिंग करणे यांसारख्या नियम उल्लंघनांवर प्रगत कॅमेऱ्यांच्या माध्यमातून लक्ष ठेवले जाते. समृद्धी महामार्गावरही संबंधित प्रणाली लागू करण्याची परिवहन विभागाची योजना आहे.

गेल्या वर्षीची आकडेवारी 2024 मध्ये मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर एकूण 191 अपघात झाले त्यापैकी 74 प्राणघातक अपघातांमध्ये 90 जणांचा मृत्यू झाला. तसेच समृद्धी एक्स्प्रेसवेवर वर्षभरात 137 अपघात झाले. त्यातील 96 प्राणघातक अपघातांमध्ये 126 जणांचा बळी गेला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;