पहिल्यांदाच होणार स्वामींची भस्मारती; निस्सीम भक्तीचं नवं गूढ उलगडणार
कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘जय जय स्वामी समर्थ’मध्ये नव्या अध्यात्मिक आणि भावनिक प्रवासाची सुरुवात होत आहे. हा नवा अध्याय मालिकेच्या कथा-प्रवाहात महत्त्वपूर्ण वळण घेऊन येणार आहे.
जिथे स्वामी समाधीस्थ अवस्थेत असतात. तिथे पारंपरिक आरतीची तयारी सुरू असते आणि अचानक स्वामी आदेश देतात की यावेळी भस्मारती केली जावी. ही अनपेक्षित मागणी वातावरण बदलून टाकते.
लगेच शंखनाद, झांजा आणि रुद्र जपाचा गूंज सुरू होतो. झांजांच्या नादात, धूपाच्या धुरामध्ये, पंचारतीऐवजी भस्माची आरतीची सुरुवात होते. पुढे काय होणार हे प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात पहायला मिळेल.
भस्म उडवतानाचे क्षण दिव्य आणि मंत्रमुग्ध करणारे वाटतात. बाळप्पा स्वामींच्या चरणी धोत्र्याचं फूल अर्पण करतात, जे मालिकेच्या आध्यात्मिक गाभ्याशी सुसंगत आहे.
कारण स्वामींचं असं म्हणणं आहे, "जे इतरांना त्याज्य वाटतं, ते आम्हाला प्रिय असू शकतं." दुसरीकडे, कृष्णा नावाची तरुण मुलगी स्वामींच्या पादुका घट्ट पकडून प्राणपणाने धावताना दिसते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List