दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? सुनील तटकरेंचे एक घाव दोन तुकडे, स्पष्टच सांगितलं..

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? सुनील तटकरेंचे एक घाव दोन तुकडे, स्पष्टच सांगितलं..

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. यावर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. यासंदर्भात आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया देताना मोठं वक्तव्य केलं आहे. ’दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात प्रस्ताव ही नाही आणि चर्चा ही नाही’, असं सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले सुनील तटकरे? 

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे, यावर बोलताना सुनील तटकरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ते रायगडमध्ये बोलत होते. “आमच्याकडे असा कोणता ही प्रस्ताव आलेला नाही किंवा वरिष्ठ पातळीवर तशी कुठलीही चर्चा नाही. त्यामुळे आज हा प्रश्न उद्भवत नाही”, असं सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या गोटात देखील हालचालींना वेग आला आहे. बुधवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती, त्यानंतर शिवेसना ठाकरे गटाचे आमदार सचिन आहिर यांनी देखील पवार यांची भेट घेतली आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व प्राप्त झालं आहे. मात्र त्यानंतर आता “आमच्याकडे असा कोणता ही प्रस्ताव आलेला नाही किंवा वरिष्ठ पातळीवर तशी कुठलीही चर्चा नाही. त्यामुळे आज हा प्रश्न उद्भवत नाही” असं म्हणत सुनील तटकरे यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

दुसरीकडे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देखील यावर बोलताना मोठं वक्तव्य केलं होतं. जर शरद पवार आमच्या सोबत आले असते तर ते या देशाचे राष्ट्रपती होऊ शकले असते, आताही शरद पवारांचं स्वागतच आहे, असं आठवले यांनी म्हटलं आहे, ते जालन्यात बोलत होते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बुडत्या ‘पीसीबी’ला ‘आयसीसी’चा काडीचा आधार बुडत्या ‘पीसीबी’ला ‘आयसीसी’चा काडीचा आधार
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी (डब्ल्यूटीसी) बक्षिसांची रक्कम जाहीर केली असून विजेत्या संघाला 30.69 कोटी तर उपविजेत्या...
पाणी पिऊनही घसा कोरडाच राहतो? सतत तहान लागण्यामागे असू शकते हे कारण
सरन्यायधीश भूषण गवई यांचा पहिल्याचा खटल्यात नारायण राणेंना दणका, वनविभागाची जमीन बिल्डरला देण्याच्या निर्णय केला रद्द
न्यायालयातच पीडितेला प्रपोज, बलात्काराच्या आरोपीची शिक्षा स्थगित; नेमकं प्रकरण काय?
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? सुनील तटकरेंचे एक घाव दोन तुकडे, स्पष्टच सांगितलं..
लग्न, फसवणुक आणि षडयंत्र; इंटीमेट सीन्सचा भडीमार आहे या सिनेमांमध्ये
बीडीडी पुनर्विकास प्रकल्पातील घरांचा ताबा देण्यास विलंब का होतोय? आदित्य ठाकरे यांचा म्हाडाला सवाल