दहावीत मराठी विषयात पास होणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण घटलं, इंग्रजी शिकण्यात पोरं अव्वल

दहावीत मराठी विषयात पास होणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण घटलं, इंग्रजी शिकण्यात पोरं अव्वल

मराठी ही महाराष्ट्राची ही राजभाषा आहे. पण हीच राजभाषा शिकताना मुलांना अडचण येत आहे. दहावीत मराठी विषयात पास होण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षात घटले आहे. आणि दुसरीकडे इंग्रजीत पास होण्याचे प्रमाण वाढले आहे. फक्त मराठीच नाही तर हिंदी शिकतानाही मुलांना अडचण येतेय.

टाईम्स ऑफ इंडियाने याबाबात वृत्त दिले आहे. 2022 साली दहावीच्या परीक्षेत 97 टक्के विद्यार्थी मराठी विषयात पास झाले होते. यंदा यात घट होऊन 94 टक्के विद्यार्थी मराठीत पास झाले आहे. हिंदीत 2022 साली पास होण्याचे प्रमाण 97 टक्के इतकं होतं. आता 2025 साली ते प्रमाण कमी होईन 94.1 टक्क्यांवर आलं आहे. दुसरीकड इंग्रजीत पास होण्याचे प्रमाण हे 98 टक्क्यांपर्यंत आहे. गणित आणि विज्ञान विषयातही पास होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. पण या विषयात पास होण्याचे प्रमाण हे 95 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

हल्लीची मुलं वाचतच नाही त्यामुळे त्यांच मराठी आणि हिंदी चांगलं होत नाही असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. दुसरीकडे मुलं मोबाईलमध्ये गुंग असतात. मोबाईलवरून अ‍ॅप्सचा वापर असेल किंवा मेसेज करणे असेल यामध्ये इंग्रजीचा वापर होतो. त्यामुळे मुलांचं इंग्रजी चांगलं होतं असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. तसेच पालकही मुलांचं इंग्रजी चांगलं व्हावं म्हणून अधिक प्रयत्न करताना दिसतात.

राज्यात जे मराठी विद्यार्थ्यांना शिकवलं जातं ते हिंदी आणि इंग्रजीपेक्षा कठीण असतं असं काही तज्ज्ञांनी म्हटलं आहे. तसेच आता पत्र लेखन ही गोष्ट कालबाह्य झालेली आहे, तरी मुलांना ते शिकवलं जातं आणि परीक्षेत तो प्रश्नही असतो.

यात शिक्षकांचही दोष असल्याचे काही तज्ज्ञांनी म्हटलं आहे. राज्यात शिक्षक होण्यासाठी कमीत कमी बारावी आणि दोन वर्षांचे डी एड असणे आवश्यक आहे. पण सातवीच्या विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञान शिकवण्यासाठी एवढी पात्रता कमी आहे असे तज्ज्ञांनी म्हटलं आहे. एखादा कला विभागातून पास झालेला शिक्षक जर दुसरीच्या मुलांना गणित शिकवत असेलत तर मुलांना त्या विषयात रुची निर्माण होईलच असे नाही, मुलांना शिकवण्यासाठी त्या विषयातले तज्ज्ञ हवेत असेही शिक्षणतज्ज्ञांनी म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? सुनील तटकरेंचे एक घाव दोन तुकडे, स्पष्टच सांगितलं.. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? सुनील तटकरेंचे एक घाव दोन तुकडे, स्पष्टच सांगितलं..
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा सध्या...
लग्न, फसवणुक आणि षडयंत्र; इंटीमेट सीन्सचा भडीमार आहे या सिनेमांमध्ये
बीडीडी पुनर्विकास प्रकल्पातील घरांचा ताबा देण्यास विलंब का होतोय? आदित्य ठाकरे यांचा म्हाडाला सवाल
रिसॉर्टमधील तंबू कोसळून पर्यटक तरुणीचा मृत्यू, तीन जण जखमी
भरधाव ट्रकची कारला धडक, एकाच कुटुंबातील 5 जण ठार; 8 गंभीर जखमी
अभिनेता गोविंदाची डाळिंब,आंब्याच्या फळबांगाना भेट; शेतकऱ्याचं केलं कौतुक तर गावकऱ्यांशी गप्पा
तो एकमेव सिनेमा ज्यामध्ये रजनीकांत यांच्या खऱ्या पत्नीने केले होते काम