मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षात धमकीचा ई-मेल; दोन दिवसांत बॉम्बस्फोट होणार
दोन दिवसांत कुठेही बॉम्बस्फोट होईल. याकडे दुर्लक्ष करू नका, असा धमकीचा ई-मेल मंत्रालयातील आपत्कालीन व्यवस्थापनाच्या नियंत्रण कक्षाला आल्याने खळबळ उडाली आहे. याची गंभीर दखल घेत मुंबई पोलीस, एटीएस पथकाने धमकीच्या अनुषंगाने तपास सुरू केला आहे. सध्याच्या तणावाच्या परिस्थितीत हा मेल आल्याने सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. तीन दिवसांपूर्वी टाटा इस्पितळात धमकीचा ई-मेल आला होता. त्यानंतर आता मंत्रालयाच्या आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षात धमकीचा ई-मेल धडकला आहे. दोन दिवसांत कुठेही बॉम्बस्फोट होईल. या ई-मेलला हलक्यात घेऊ नका, असे त्या धमकीच्या ई-मेलमध्ये नमूद केले आहे. याबाबत तत्काळ एटीएसला कळविण्यात आले. तसेच महाराष्ट्र पोलीस मुख्यालयाला याबाबत अवगत करण्यात आले. त्यानंतर या धमकीबाबत मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. पोलिसांनी ई-मेलची दखल घेत मंत्रालयात तपासणी केली; परंतु संशयास्पद असे काहीच आढळून आले नाही.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List