Rain Alert : मुंबईसह या भागात कोसळधार, अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसासह गारपिटीचा इशारा, वाचा सविस्तर

Rain Alert : मुंबईसह या भागात कोसळधार, अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसासह गारपिटीचा इशारा, वाचा सविस्तर

राज्याला मान्सूनचे वेध लागले आहे. पण अचानक अवकाळी पावसाचे संकट पुढ्यात येऊन उभे ठाकले आहे. काल राज्यातील अनेक भागाला अवकाळी पावसाने तडाखा दिला. राज्यातील अनेक भागात गडगडाटासह पाऊस पडला. मुंबईसह राज्यातील काही भागांना यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काल आणि आज काही भागात पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने काल मुंबईसाठी यलो अलर्ट जारी केला होता.

अनेक जिल्ह्यांना येलो-ऑरेंज अलर्ट

राज्यात सतत अवकाळी पाऊस सुरू आहे. विदर्भ, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत अवकाळी पाऊस पडला. हवामान विभागाने मुंबई-ठाण्यासह अनेक जिल्ह्यांत अलर्ट जारी केले आहे. मुंबई-ठाण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांत येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूरमध्ये पावसाची शक्यता आहे. तर गोंदिया, भंडारा, गडचिरोली, वर्धा, यवतमाळसाठी १४-१५ मे रोजी ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. तर काही भागात वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता आहे. अनेक जिल्ह्यांवर ढगाळ वातावरणामुळे पारा एकदम खाली आला आहे.

मान्सून ६ जून रोजी राज्यात

नैऋत्य मोसमी पावसाचा अंदमान-निकोबारमध्ये प्रवेश केला आहे. या ठिकाणी पुढील २४ तास अतिवृष्टीची शक्यता आहे. मान्सून २७ मे रोजी केरळमध्ये तर ६ जूनला महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सकाळपासून मुंबई आणि उपनगरात ढगाळ वातावरण असून पुढील 24 तासाच्या आत काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. ६ जूनला मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

धाराशिवला सलग दुसर्‍या दिवशी अवकाळीचा तडाखा

धाराशिव जिल्ह्याला सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने चांगला तडाखा दिला आहे. धाराशिव, भूम, तुळजापूर भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. जवळपास तासभर झालेल्या या पावसाने शिवारात पाणीच पाणी केलं. वादळी वाऱ्यामुळे अनेक भागात विद्युत पुरवठा देखील खंडित झाला होता. धाराशिव शहरात रात्री उशिरा देखील पावसाच्या सरी बरसल्या. उमरगा तालुक्यात एका घोड्यासह चार जनावरे वीज पडून दगावली आहेत. हवामान विभागाने धाराशिव जिल्ह्यात येलो अलर्ट जारी केला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘अजितदादा, शरद पवार, सुप्रिया सुळे एवढाच त्यांचा पक्ष…’ , राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा, चंद्रकांत पाटलांचा खोचक टोला ‘अजितदादा, शरद पवार, सुप्रिया सुळे एवढाच त्यांचा पक्ष…’ , राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा, चंद्रकांत पाटलांचा खोचक टोला
मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्र...
एक कॉल, एक क्लिक आणि खात्यातून उडाले 6 लाख, कॉल गर्लची सेवा विद्यार्थ्याला महागात!
वयाच्या 58 व्या वर्षी या अभिनेत्रीचे बोल्ड अन् सेमीन्यूड फोटोशूट; सोशल मीडियावर जोरदार चर्चा
नीता अंबानी चा फिटनेस ट्रेनर विनोद चन्ना आहे गडगंज श्रीमंत; सोशल मीडियावर का केलं जातंय सर्च?
वसई-विरारमध्ये 13 ठिकाणी ईडीची कारवाई, 41 बेकायदेशीर इमारती प्रकरणी छापे
Ratnagiri Crime – सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, एक जण ताब्यात; लॉजवर छाप टाकून पोलिसांनी कारवाई
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड भिकेला लागले, पैसे वाचवण्यासाठी शोएब मलिकसह 5 जणांची केली हकालपट्टी