लढाऊ विमानांच्या घेऱयात ट्रम्प सौदीत; 12.1 लाख कोटींचा संरक्षण करार
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आजपासून सौदी अरेबियाच्या दौऱयावर असून ते आज सौदीच्या एफ 15 या लढाऊ विमानांच्या घेऱ्यात देशात दाखल झाले. त्यांना कडेकोट हवाई संरक्षण देण्यात आले. अशाप्रकारे अमेरिकेसारख्या आर्थिक महासत्ता असलेल्या देशाच्या राष्ट्राध्यक्षाला लढाऊ विमानांनी एस्कॉर्ट केल्याची ही पहिलीच घटना आहे. दरम्यान, अमेरिका आणि सौदी अरेबिया यांच्यात तब्बल 12.1 लाख कोटी रुपयांच्या संरक्षण करार झाला. हा सर्वात मोठा संरक्षण करार असल्याचे व्हाईट हाऊसने म्हटले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List