जम्मू कश्मीरमध्ये सुप्रसिद्ध 48 पर्यटन स्थळं आणि रिसॉर्ट्स बंद, सुरक्षेच्या कारणास्तव निर्णय

जम्मू कश्मीरमध्ये सुप्रसिद्ध 48 पर्यटन स्थळं आणि रिसॉर्ट्स बंद, सुरक्षेच्या कारणास्तव निर्णय

जम्मू कश्मीरमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव अनेक रिसॉर्ट्स आणि प्रसिद्ध पर्यटनस्थळं बंद करण्यात आली आहेत. पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला होता, त्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

जी पर्यटनस्थळं बंद करण्यात आली आहे ती जागा सुंदर दऱ्या खोऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे दुधपात्री आणि वैरीनागसारख्या पर्यटनस्थळांवर बंदी घातली असून या भागातील 48 रिसॉर्ट्स बंद करण्यात आले आहेत. सुरक्षा दलाच्या सल्ल्यानुसार जम्मू कश्मीरच्या सरकारने हा निर्णय घेतला आहे. जम्मू कश्मीरमध्ये पुन्हा हल्ला होऊ शकतो असा अंदाज गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केला होता. त्यामुळेच राज्यातील 87 पैकी 48 पर्यटन स्थळ बंद करण्यात आले आहेत.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पहलगाम हल्ल्यानंतर खोऱ्यात काही दहशतवादी सक्रिय झाले आहेत. आणि त्यांना पुन्हा हल्ला करण्याचे आदेश मिळाले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;