सकाळी उठल्यानंतर तांब्याच्या भांड्यातील पाणी का प्यावं? वाचा सविस्तर

सकाळी उठल्यानंतर तांब्याच्या भांड्यातील पाणी का प्यावं? वाचा सविस्तर

सकाळी उठल्यानंतर तांब्याच्या भांड्यातील पाणी का प्यावं? वाचा सविस्तरतांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्यामुळे आपल्याला खूप सारे फायदे मिळतात हे आपण सतत ऐकत आलोय. तांब्याच्या भांड्यात असलेल्या गुणधर्मामुळे पाणी पिण्याचा सर्वात जास्त फायदा होतो. आपण कायमच पाण्याला जीवन म्हणून संबोधतो, म्ह्णूनच  निरोग़ी  आरोग्यासाठी  संतुलित  आहार, योग्य व्यायाम  याचबरोबर भरपूर  पाणी  पिण्याचा  सल्ला  दिला  जातो. शारिरीक  स्वास्थ्य  सुधारण्यासाठी हेच पाणी सकाळी अनशी पोटी व तांब्याच्या भांड्यात ठेवलेले प्यायल्यास त्याचा अधिक फायदा होतो.

तांब्यातील  जंतूनाशक गुणधर्मामुळे पोटातील जिवाणूंचा नाश  होतो, जळजळ होण्याची  समस्या  कमी  होते. तसेच  तांब्याच्या भांड्यात  ठेवलेले पाणी प्यायल्याने पचनक्रियेचा मार्ग स्वच्छ  होतो. परिणामी  पोट  स्वच्छ  राहण्यास मदत  होते. पचनसंस्थेला चालना देण्याबरोबरच  हे पाणी शरीरातील  अतिरिक्त  मेद कमी  करण्यास  मदत  करते. शरीराला आवश्यक मेद शोषून घेतल्यानंतर चरबी  वाढवणारे  अनावश्यक मेद बाहेर टाकण्यास मदत  होते.  यामुळे  तुमचे  वजन काबूत  राहण्यास  नक्कीच मदत होते.

तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी अ‍ॅन्टीबॅक्टेरीयल तसेच अ‍ॅन्टीवायरल असल्याने दाह कमी करण्यास मदत  होते. तांब्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते. तसेच नवीन पेशींची निर्मीती होते. तांब्यामुळे शरीराच्या आतील जखमा विशेषतः पोटातील जखमा लवकर भरण्यास मदत होते.

 

तांब्याच्या नैसर्गिक जंतुनाशक गुणधर्मामुळे पाणी निर्जंतुक होते व आरोग्याच्या दृष्टीनेही अधिक उपयोगी गुणधर्म त्यात सामाविष्ट होतात. तसेच कफाची समस्या असलेल्यांनी या पाण्यामध्ये तुळशीचे पान टाकावेत. पित्त, अल्सर किंवा पोटात  ग़ॅसचा  विकार होणार्‍यांसाठी तांब्याच्या  भांडात ठेवलेले  पाणी पिणे अत्यंत हितकारी  आहे.

 

काळानुरूप जीवनशैलीत बदल झाले व पारंपारिक वस्तूंची जागा पाश्चात्य संस्कृतीने  घेतली. तांब्याच्या  भांड्यात  ठेवलेले  पाणी का  प्यावे आयुर्वेदानुसार  तांब्याच्या  भांड्यात  ठेवलेले  पाणी  त्रिदोषहारक ( कफ , पित्त, वात) असते. त्यामुळे  किमान 8  तास तांब्याच्या  भांड्यात  ठेवलेले  पाणी नियमित प्यावे.

(कोणतेही उपाय करताना तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;