Chandrapur News : दोन वाघाच्या झुंजीत एका वाघाचा मृत्यू

Chandrapur News : दोन वाघाच्या झुंजीत एका वाघाचा मृत्यू

दोन वाघाच्या झुंजीमध्ये एका वाघाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पअंतर्गत वनपरिक्षेत्र कार्यालय खडसंगी बफरमध्ये कक्ष क्रमांक 63 मध्ये ही घटना घडली. दोन वाघाची झुंज झाली असून यामध्ये छोटा मटका या वाघाने दुसऱ्या वाघाला झुंजीत ठार केले आहे. सोमवारी सगळीकडे जंगलामध्ये बुद्ध पौर्णिमेच्या रात्री प्राणी गणना सुरू होती.

सोमवारी सफारी करत असलेल्या पर्यटनकांना तसेच मचानावर असलेल्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना अचानक दोन वाघाची झुंजीचा आवाज ऐकू आला. वाघाचा शोध घेतला असता, त्यामध्ये एक वाघ मृत अवस्थेत आढळून आला. तसेच दुसऱ्या वाघाचे नाव छोटा मटका असून हा सुद्धा जखमी झाला आहे. यावेळी वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित सहायक वनसंरक्षक दुबे, खडसंगी वनपरिक्षेत्र अधिकारी राऊत, क्षेत्र सहाय्यक हटवार, वनरक्षक लोखंडे आदी वन कर्मचारी उपस्थित होते. मृत्यू पावलेल्या वाघाला पी.एम. साठी चंद्रपूर टीटीसी या ठिकाणी पाठवण्यात आलेला आहे. छोटा मटका या वाघाने आतापर्यंत तीन वाघाला ठार केलेले आहे. या अगोदर त्यांनी अर्जुनी गावातील शेत शिवार परिसरात एक वाघ तर मागील वर्षी बजरंग या ताडोबातील नावाजलेल्या वाघाला ठार केले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;