काय करतात हे? मराठी नेत्याने विचारताच अशोक सराफ यांना आलेला भयंकर संताप

काय करतात हे? मराठी नेत्याने विचारताच अशोक सराफ यांना आलेला भयंकर संताप

सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांना आजवरच्या करिअरमध्ये चाहत्यांसोबतचे अनेक प्रकारचे अनुभव आले. काहींनी त्यांना अक्षरश: डोक्यावर उचलून घेतलं, तर काहींनी त्यांना ओळखलंसुद्धा नाही. कलाविश्वात उल्लेखनीय काम केल्यानंतर आणि लोकप्रियता मिळवल्यानंतरही सेलिब्रिटींना असेही काही अनुभव येतात, जिथे त्यांना स्वत:ची ओळख नव्याने सांगावी लागते. असाच एक अनुभव अशोक सराफ यांच्याही आयुष्यात आला. ‘मी बहुरुपी’ या आत्मचरित्रात त्यांनी हा किस्सा सांगितला आहे. एकदा त्यांना मुंबईत एका समारंभाला प्रमुख पाहुणा म्हणून बोलावलं होतं. एका राजकीय पक्षाचे पुढारी त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.

अशोक सराफ जेव्हा त्या कार्यक्रमाला पोहोचले, तेव्हा अध्यक्ष महाशय तिथे आलेले नव्हते. तेव्हा स्वाभाविकच सगळ्या कार्यकर्त्यांचा गराडा अशोक सराफ यांच्याभोवती जमला होता. दारं-खिडक्यांमधून लोक डोकावून बघत होते. त्यांना हटवणं कठीण झालं होतं. अखेर कार्यकर्त्यांनी अशोक सराफ यांना एका खोलीत नेऊन बसवलं. चहा-कॉफी, काय हवं नको ते विचारलं. पंधरा एक मिनिटांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष आले. त्यांनाही अशोक सराफ यांच्याच खोलीत आणून बसवलं. तेव्हा एकाने अशोक सराफ यांची त्यांच्याशी ओळख करून दिली, ‘हे अशोक सराफ.’ त्या राजकीय नेत्यानेही अशोक सराफ यांना नमस्कार केला आणि विचारलं, ‘काय करतात हे?’ हा प्रश्न ऐकताच त्यांना भयंकर संताप आला होता.

महाराष्ट्रातल्या एका मराठी नेत्याला अशोक सराफ कोण हे माहीत नसावं? माझे चित्रपट माहीत नसतील तर एकवेळ मी समजू शकत होतो, पण नावही ऐकलेलं नाही, हे माझ्या पचनी पडलं नाही, अशी भावना अशोक सराफ यांनी व्यक्त केली. परंतु या घटनेनंतर एक मोलाची गोष्ट जाणवल्याचं ते म्हणतात. ते म्हणजे आपण आयुष्यात कितीही काहीही मिळवलं तरी पाय जमिनीवर असायला हवेत. असे प्रसंग आयुष्यात आले तरी काही प्रसंग मात्र या सगळ्यांच्या पलीकडचं सुख देणारे असतात, असंही त्यांनी सांगितलं. हा प्रसंग आशा भोसले यांनी केलेल्या कौतुकाचा होता.

‘प्रवास’ या चित्रपटाच्या एका खासगी शोला आशा भोसले आल्या होत्या. शो संपल्यावर अशोक सराफांनी त्यांनी भेट घेतली आणि नमस्कार केला. तेव्हा आशाताई त्यांना म्हणाला, “चांगलं काम केलंय तुम्ही.” इतकंच म्हणून त्या थांबल्या नाहीत. तर “तुम्ही चांगलं काम केलंय असं म्हणणं म्हणजे लता मंगेशकर चांगली गाते असं म्हणण्यासारखं आहे”, हे त्यांचंं पुढचं वाक्य ऐकून अशोक सराफ क्षणभर स्तब्धच झाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

1300 कोटींचे दागिने, 40 कोटींचा ड्रेस,लाखोंचे पाकीट; कान्समध्ये उर्वशी रौतेलाच्या लूकची किंमत शाहरूखच्या ‘मन्नत’पेक्षाही जास्त 1300 कोटींचे दागिने, 40 कोटींचा ड्रेस,लाखोंचे पाकीट; कान्समध्ये उर्वशी रौतेलाच्या लूकची किंमत शाहरूखच्या ‘मन्नत’पेक्षाही जास्त
सध्या सर्वत्र चर्चा आहे ती कान्स फिल्म फेस्टिव्हल 2025ची. अनेक अभिनेत्री कान्सच्या रेड कार्पेटवर आपली अदाकारी दाखवतात. आपल्या सौंदर्याने सर्वांना...
शाहरुख खान त्याच्या मुलांकडून ही गोष्ट शिकला? अभिनेत्याने कुटुंबाबद्दलचं हे खास सिक्रेट सर्वांशी केलं शेअर
सैफचा लेक इब्राहिम अली खान या गंभीर आजाराशी आजही लढतोय; ऐकायला अन् बोलायला आजही त्रास अन् मेंदूवरही…
युरिक एसिड वाढलंय, या फूड्स पासून राहा दूर, अन्यथा त्रासात होणार वाढ
पत्नीला सरप्राईज देण्यासाठी हेअर ट्रान्सप्लान्ट करायला गेला, पण इंजेक्शन देताच होत्याचं नव्हतं झालं
कर्नल सोफिया कुरेशींवर वादग्रस्त टिप्पणी करणं भोवलं, भाजप मंत्र्याविरोधात FIR दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
12 वर्षांनी मुलगा झाला, मांत्रिकाच्या नादात आईने चिमुकल्याला कालव्यात फेकलं