निवृत्तीनंतर कोणतेही पद स्वीकारणार नाही! संजीव खन्ना यांनी केले स्पष्ट
निवृत्तीनंतर मी कोnणतेही पद स्वीकारणार नाही, पण कदाचित कायद्याच्या क्षेत्रात काहीतरी करेन, असे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी स्पष्ट केले. भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना आज निवृत्त झाले. सकाळीच त्यांनी सर्वोच्च न्यायालयातील त्यांच्या सहकाऱयांना निरोप दिला. तसेच न्यायमूर्ती बी. आर. गवई यांच्याकडे त्यांच्या पदाची सूत्रे सोपवली. दरम्यान, माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी यापुढे आपण कोणतेही पद स्वीकारणार नसल्याचे सांगत त्यांनी सरकारी आयोग किंवा घटनात्मक पदावर काम करणार नसल्याचे संकेत दिले.
न्या. यशवंत वर्मा प्रकरणाबद्दल बोलताना सरन्यायाधीश खन्ना म्हणाले की, न्यायिक विचारसरणी निर्णायक असली पाहिजे आणि न्याय निर्णायक असला पाहिजे. आपण कोणत्याही मुद्दय़ाच्या सकारात्मक आणि नकारात्मक पैलूंकडे पाहतो आणि नंतर तर्कशुद्धपणे निर्णय घेतो. जेव्हा आपण हे करतो तेव्हा आपण निर्णय घेतो, मग घेतलेला निर्णय कसा होता हे भविष्यच सांगेल.
एकदा तुम्ही वकील झालात की, तुम्ही आयुष्यभर वकीलच राहता. न्यायव्यवस्था ही एक सामान्य संज्ञा आहे, जी खंडपीठ आणि बारचे प्रतिनिधित्व करते. बार हा विवेकाचा रक्षक आहे. न्यायाधीश वेगवेगळय़ा पार्श्वभूमीतून सर्वोच्च न्यायालयात येतात आणि या विविधतेमुळे न्यायालयीन निर्णय घेण्यास मदत होते, असे खन्ना म्हणाले.
बी.आर. गवई आज घेणार सरन्यायाधीशपदाची शपथ
न्यायमूर्ती बी. आर. गवई उद्या भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील. न्या. गवई यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1960 रोजी अमरावतीमध्ये झाला. त्यांचे वडील रामकृष्ण सूर्यभान गवई आंबेडकरी चळवळीच्या प्रमुख नेत्यांपैकी होते. त्यांनी अमरावतीचे खासदार पद व पुढे बिहार, सिक्कीम आणि केरळचे राज्यपाल पद भूषवले.
गवई मूलभूत अधिकार, स्वातंत्र्याचे रक्षण करतील
निवृत्तीच्या दिवशी खंडपीठाला संबोधित करताना संजीव खन्ना निःशब्द झाले होते, परंतु यावेळी त्यांनी त्यांचे उत्तराधिकारी गवई यांचे काwतुक केले. गवई यांच्या रूपाने एक महान सरन्यायाधीश मिळालेत. ते मूलभूत अधिकार व स्वातंत्र्याचे रक्षण करतील, असे खन्ना म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List