3 वर्षांनी मोठ्या ‘अंगुरी भाभी’शी लग्नापूर्वीच का तुटलं नातं? अभिनेत्याने सोडलं मौन
‘भाभीजी घर पर है’ फेम अभिनेत्री शिल्पा शिंदे आणि टीव्ही अभिनेता रोमित राज हे ‘मायका’ या मालिकेच्या सेटवर एकमेकांना भेटले. एकत्र काम करताना दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि हळूहळू या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. सहा महिने एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु लग्नापूर्वीच त्यांच्या नात्याला तडा गेला आणि दोघांनी साखरपुडा मोडला. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रोमितने यामागच्या कारणाचा खुलासा केला.
आरजे सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत रोमित म्हणाला, “होय मी शिल्पाला डेट केलं होतं, पण ही 16 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आम्ही मायका या मालिकेच्या सेटवर भेटलो होतो. तेव्हा मला मुंबईत येऊन दहा वर्षे झाली होती आणि त्यावेळी मी कोणालाच डेट करत नव्हतो. शिल्पा स्वभावाने खूप चांगली होती आणि त्यावेळी तिने माझी खूप मदत केली होती. एकत्र काम करताना आम्ही सहा महिने एकमेकांना डेट केलं आणि आमच्या दोघांच्याही मनात लग्न करण्याची इच्छा होती.”
ब्रेकअपचं कारण सांगताना तो पुढे म्हणाला, “मी माझ्या कुटुंबीयांना शिल्पाविषयी सांगितलं होतं. परंतु सहा महिन्यांनंतर आम्हाला समजलं की आम्ही एकमेकांसाठी बनलेलो नाही. जर आमचं लग्न झालं असतं तर ते फार काळ टिकलं नसतं. माझ्या मते ते नातं संपवण्याचा निर्णय योग्यच होता. आम्हा दोघांचीही ठाम मतं होती आणि गोष्टींकडे बघण्याचा दृष्टीकोन खूप वेगळा होता. तिनेच आधी हे लग्न मोडलं. ब्रेकअप झाल्यानंतर आम्ही कधीच मैत्री ठेवण्याचा प्रयत्न केला नाही आणि त्यानंतर आम्ही कधी भेटलोसुद्धा नाही.”
शिल्पाने जेव्हा ‘बिग बॉस 11’मध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला होता, तेव्हा तिला बऱ्याच ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. त्यावेळीही रोमितने सर्वांत आधी तिचा बचाव केला होता. “शिल्पा बिग बॉसच्या घरात असताना लोकांनी मला मेसेज करण्यास सुरुवात केली होती. बरं झालं तू तिच्याशी लग्न केलं नाहीस, असं ते म्हणू लागले. तिच्याविषयी वाटेल ते लिहू लागले. मला माहीत नाही का पण तिच्याबद्दल कोणीही वाईट बोललेलं मला आवडत नाही. एका शोमध्ये फक्त एक तास पाहून तुम्ही त्या व्यक्तीबद्दल वाटेल ते मत बनवू शकत नाही. ती खूप प्रेमळ आणि हुशार मुलगी आहे. मी तिला पाठिंबा दर्शविल्यानंतर तीन महिन्यांनी तिने त्या शोचं विजेतेपद पटकावलं होतं”, असं रोमितने सांगितलं. शिल्पासोबतचं नातं संपुष्टात आल्याच्या काही वर्षांनंतर रोमितने टिना कक्करशी लग्न केलं. या दोघांना एक मुलगी आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List