लग्नाआधीच प्रेग्नंट,बाळाला स्वीकारण्यास बॉयफ्रेंडचा नकार; अखेर बॉलिवूड अभिनेत्रीने केलं अबॉर्शन,कंगनाने दिला धीर
बॉलिवूड सेलिब्रिटींचे असे अनेक प्रसंग समोर येतात. ते चांगले असतील किंवा वाईट अनुभव असतील. पण शक्यतो सेलिब्रिटींच्या अफेअरच्या चर्चा चांगल्याच रंगतात. घटस्फोट, अफेअर प्रमाणेच, त्यांची प्रेमात झालेली फसवणूक असो अशा अनेक गोष्टी सेलिब्रिटींच्या आयु्ष्यातही घडून गेलेल्या असतात. अशीच एक अभिनेत्री आहे जी एका लोकप्रिय आणि प्रसिद्ध दिग्दर्शकासोबत रिलेशनशिपमध्ये होती आणि लिव्ह-इन रिलेशनशिप दरम्यान ती प्रेग्नंट देखील राहीली मात्र नंतर तिच्या बॉयफ्रेंडने त्यांच्यां बाळाला स्वीकारण्यास नकार दिला आणि अखेर अभिनेत्रीला अबॉर्शन करावं लागलं.
लग्नाआधीच प्रेग्नेंट राहिली अभिनेत्री
ही अभिनेत्री म्हणजे मंदाना करीमी आहे. मंदानाने कंगनाच्या ‘लॉक अप’ या शोमध्ये तिच्या आयुष्यातील या प्रसंगाबद्दल सांगितले होते. मंदानाने सांगितले की ती चित्रपट निर्मात्यासोबत सीक्रेट रिलेशनशिपमध्ये होती.
तिने सांगितलं की, ” तो दिग्दर्शक मला म्हणाला की, मी माझे नाते सीक्रेट ठेवले होते कारण माझा घटस्फोट झाला नव्हता. तसेच लॉकडाऊन दरम्यान आम्ही एकत्रही राहू लागलो. तो म्हणायचा की तो माझ्यावर खूप प्रेम करतो. मी त्याला माझा जोडीदारही मानत होते आणि तो मला त्याचे प्रेम म्हणायचा.”
प्रेग्नेंसी प्लान करूनही दिग्दर्शकाचा बाळास स्वीकार करण्यास नकार
मंदाना पुढे म्हणाली, ‘आम्ही प्रेग्नेंसी प्लानही केला होता. पण जेव्हा मी खरंच प्रेग्नंट राहिले तेव्हा तो मागे हटला. तो म्हणाला की तो पुन्हा वडील होण्यासाठी भावनिकदृष्ट्या तयार नाही. त्याला आधीच एक मूल होते. एके दिवशी तो म्हणाला, मला विश्वासच बसत नाहीये की तू इतक्या सहजपणे प्रेग्नंट कशी राहिलीस आणि तेही वयाच्या 33 व्या वर्षी.’
अखेर अभिनेत्रीला करावं लागलं अबॉर्शन
पुढे तिने सांगितले की, ” यानंतर तो मला माझ्या मित्रांकडे घेऊन गेला. आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा त्याने माझ्या मित्राला सांगितले की तो तयार नाही. त्याने माझ्या मित्रांना पटवून देण्यासाठी पूर्ण नियोजन केले होते. जेव्हा आम्ही घरी गेलो तेव्हा त्याने मला सांगितले की तुला हे समजून घ्यावं लागेल की माझी एक्स अजूनही माझ्यापासून दूर नाही आणि माझ्याविरुद्ध पब्लिक केसही सुरू आहे. त्यानंतर मला अबॉर्शन करावं लागलं.मंदानाने असेही म्हटले होते की ती त्या व्यक्तीचे नाव घेणार नाही कारण तो नाव घेण्यास पात्र नाही.
कंगनाने दिला धीर
मंदानाने सांगितलेली घटना ऐकून कंगना तिला म्हणाली की, ‘आपण समानतेबद्दल कितीही बोललो तरी आपल्यासोबत अशा गोष्टी घडतात. प्रत्येक वेळी ती व्यक्ती बरोबर आहे की नाही हे समजून घेण्यासाठी तुम्ही वर्षानुवर्षे वाट पाहू शकत नाही. प्रत्येक महिलेला हवं असतं की ती आई व्हावी. तू ज्याचा सामना केला ते खूप धाडसी होतं. बरं, ती तुझी इच्छा होती, पण माझ्या मते तू बाळ ठेवायला हवं होतं” असं म्हणत कंगनाने तिला सल्लाही दिला.
त्यावर उत्तर देताना मंदाना म्हणाली ‘माझ्या मुलाला प्रसिद्ध वडील मिळावेत पण ते त्यांच्यासोबत नसावेत अशी माझी इच्छा होती.’ मी एका तुटलेल्या कुटुंबातून आले आहे आणि त्याचा भावनिक परिणाम मला समजतो.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List