‘तुझ्या मुस्लिम नवऱ्याला सोडून दे’, पाकिस्तानी युजरच्या कमेंटवर अभिनेत्रीचा संताप, म्हणाली ‘पाळलेले दहशतवादी…’
22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत , भारतीय सैन्याने 7 मे रोजी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. भारतीय सैन्याच्या या कारवाईवर संपूर्ण देश आनंद व्यक्त करत आहे.
अनेक सेलिब्रिटींनी देखील आपल्या भारतीय सैन्य दलाचे कौतुक केले आहे. पण यासगळ्यांमध्ये एका पाकिस्तानच्या युजर्सने एका अभिनेत्रीवर सगळा राग काढल्याचं दिसून आलं. हि अभिनेत्री हिंदू असून तिने एका मुस्लिम मुलाशी लग्न केलं आहे.
या अभिनेत्रीवर जेव्हा पाकिस्तानी युजरने काढला राग
जेव्हा या अभिनेत्रीने एक्स (ट्विटर) वर ट्वीट करून भारतीय सैन्याला पूर्ण पाठिंबा देत एक पोस्ट केली. तेव्हा तिच्या या पोस्टवर पाकिस्तानातील एका युजरने आपला राग काढला आणि तिला तिच्या मुस्लिम पतीला सोडण्याचा सल्ला दिला. त्या अभिनेत्रीने चांगलंच फटकारलं आहे.
‘तुला इस्लामचा इतकाच द्वेष असेल तर नवऱ्याला सोडून दे’
अभिनेत्री म्हणजे टीव्ही इंडस्ट्रीमधील एक नावाजलेलं नावदेवोलिना भट्टाचार्जी. पाकिस्तानी युजरने देवोलीनावर राग व्यक्त करत लिहिलं की, “मी सर्व भारतीय निर्मात्यांना विनंती करतो की कृपया देवोलीनाला काही काम द्या. ती घरी बसून वेडी झाली आहे. ती नेहमीच द्वेष पसरवत असते. मला तिचा फॅन असल्याबद्दल पश्चात्ताप होतोय. ती घाणेरडी, वाईट बोलणारी आणि मूर्ख आहे. जर तुला इस्लामचा इतकाच द्वेष असेल तर तुझ्या नवऱ्याला सोडून दे”
Hahaha…ab inko fikar hai mere kaam ki..jinki khudka koi bharosa nahi…Arey jakar apna desh aur terror camps sambhal. 2 din mein teri army international funds se bheeg maangne pe agayee hai..meri pati ki fikar mein apna khoon mat jala itna..Jo terrorists paal rakhe hai apne desh… https://t.co/NgJalJKfBo
— Devoleena Bhattacharjee (@Devoleena_23) May 9, 2025
‘अभिनेत्रीने पाकिस्तानी वापरकर्त्याला दिसं चोख उत्तर’
या सुजरच्या पोस्टवर देवोलीनाने संतापून चांगलंच उत्तर दिलं आहे. तिने म्हटलं की, “हाहाहा… आता त्यांना माझ्या कामाची काळजी वाटते आहे. ज्यांना स्वतःवर विश्वास नाही. जा आणि तुमच्या देशाची आणि दहशतवादी छावण्यांची काळजी घ्या. दोन दिवसांत तुमचे सैन्य आंतरराष्ट्रीय निधीकडून भीक मागायला आलं आहे. माझ्या पतीची काळजी करण्यात तुमचे रक्त जाळू नका. तुमच्या देशात तुम्ही ज्या दहशतवाद्यांना पोसले, पाळलं आहे त्यांना भारत सरकारच्या स्वाधीन करा… गरीब लोक माझ्यापासून कंटाळले आहेत.” अशा स्पष्ट शब्दात देवोलीनाने त्या युजरला फटकारलं आहे.
देवोलीनाने 14 डिसेंबर 2022 रोजी तिचा जिम ट्रेनर शाहनवाज शेखशी लग्न केलं. 18 डिसेंबर 2024 रोजी या जोडप्याने त्यांना एक मुलगाही झाला. सध्या, अभिनेत्री तिच्या बाळासोबत मातृत्वाचा आनंद घेताना दिसत आहे. पण या सगळ्यात ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List