Operation Sindoor- चे पुरावे आता कोणी मागणार नाही, पाकिस्तानने स्वतः दिली ‘ऑपरेशन सिंदूर’ची कबुली

Operation Sindoor- चे पुरावे आता कोणी मागणार नाही, पाकिस्तानने स्वतः दिली ‘ऑपरेशन सिंदूर’ची कबुली

आंतरराष्ट्रीय माध्यमांनी हिंदुस्थानी सैन्याने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’चे फोटो प्रसिद्ध केले आहेत. या फोटोंवरुनच हिंदुस्थानने किती विनाश केला आहे हे स्पष्टपणे दिसून येते. पाकिस्तानात अनेक ठिकाणी विध्वंसाची दृश्ये दिसत आहेत. एवढेच नाही तर लोक घरे सोडून सुरक्षित ठिकाणी जाताना दिसत आहेत. आता या स्ट्राइकद्वारे पाकिस्तानला कल्पना केली नसेल असेच उत्तर दिले गेले आहे.

जम्मू आणि कश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या 16 व्या दिवशी हिंदुस्थानने अखेर बदला घेतला. हिंदुस्थानी हवाई दलाने रात्री उशिरा ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले. याअंतर्गत हिंदुस्थानी सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील 9 दहशतवादी तळांवर सर्जिकल स्ट्राईक केले. याकरता ड्रोन आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा वापर करून 9 तळ निश्चित केले आणि तब्बल 24 हल्ले करून पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे तळ पूर्णपणे उद्ध्वस्त केले.

पहलगाम हल्ल्याला हिंदुस्थानने चोख प्रत्युत्तर दिले आहे की, यावेळी कोणीही पुरावे मागणार नाही. पाकिस्तानमधील बरेच लोक प्रत्यक्षदर्शी या आपरेशनचे प्रत्यक्षदर्शी आहेत. मंगळवारी मध्यरात्री 1.30 सुमारास हिंदुस्थानने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत बहावलपूर, मुरीदके, बाग, गुलपूर, सवाई, बिलाल, बर्नाला, महमूना कोटली आणि मुझफ्फराबाद येथे हल्ले केले. ही तीच ठिकाणे आहेत जिथून हिंदुस्थानवर दहशतवादी हल्ल्यांचे नियोजन आणि अंमलबजावणी केली जात होती. हिंदुस्थानी लष्कराने पाकिस्तानमधील फक्त दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवरच हल्ला केला आहे. हा हल्ला करुन दहशतवादी अझहर मसूद आणि हाफिज सईद यांना हिंदुस्थानने मोठा धक्का दिला आणि त्यांचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले.

पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) चे संचालक लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी सांगितले की, हिंदुस्थानने 24 क्षेपणास्त्रे डागली. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनीही हिंदुस्थानने हल्ला केल्याचे आणि क्षेपणास्त्रे डागल्याचे मान्य केले आहे.

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

चालायला जागा राहिली नाही तर लोकच फेरीवाल्यांना फटकावतील, हायकोर्टाचा गंभीर इशारा चालायला जागा राहिली नाही तर लोकच फेरीवाल्यांना फटकावतील, हायकोर्टाचा गंभीर इशारा
लोकांच्या सहनशीलतेचा अंत बघू नका. रीतसर सर्व कर भरणाऱया नागरिकांना त्यांच्याच घरात जायला रस्ता, पदपथावर चालायला जागा राहिली नाही तर...
एक एक दहशतवादी मारा… डोक्यात, छातीत गोळया घाला… हातपाय तोडून मारा! पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांची संतप्त भावना
Operation Sindoor पाकिस्तानला घरात घुसून मारले, दहशतवादी तळांवर एअरस्ट्राइक; नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त… 100 अतिरेक्यांचा खात्मा
Pahalgam Terror Attack शेख सज्जाद गुल पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड
Operation Sindoor या हल्ल्यात मी मेलो असतो तर बरे झाले असते, मसूद अझहरच्या कुटुंबातील 10 ठार
महागाईने केलं आमचं घर रिकामं, त्यातून सत्ताधाऱ्यांनी थाटली दुकानं!शिवसेनेच्या रणरागिणी आक्रमक
हिंदुस्थानी सेनेच्या शौर्याला सलाम! पाकिस्तानचे हिंदुस्थानातील ‘स्लीपर्स सेल’ उद्ध्वस्त करा – उद्धव ठाकरे