सरकारने बोलावली सर्वपक्षीय बैठक, ऑपरेशन सिंदूरवर विरोधी पक्षांशी होणार चर्चा

सरकारने बोलावली सर्वपक्षीय बैठक, ऑपरेशन सिंदूरवर विरोधी पक्षांशी होणार चर्चा

पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हल्ला करून 26 पर्यटकांना मारलं होतं. आता हिंदुस्थानी सैन्याने याचा बदला घेत ऑपरेशन सिंदूर राबवलं होतं. आता यावरच चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. 8 मे रोजी सकाळी 11 वाजता संसदेत ही बैठक होणार आहे. या बैठकीत ऑपरेशन सिंदूरबद्दल विरोधी पक्षांना माहिती दिली जाईल आणि पुढची रणनीती काय असेल याबाबत सांगितले जाईल. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी एक्सवर पोस्ट करून याबाबत माहिती दिली आहे. सर्वपक्षीय बैठक संसदेच्या पुस्तकालय भवनातील समिती कक्षा जी074 मध्ये होईल असे रिजिजू यांनी म्हटले आहे.

हिंदुस्थानी सैन्याने रात्री 1.44 वाजता पाकिस्तानच्या 9 ठिकाणी क्षेपणास्त्र डागली. या हल्ल्यात दहशतवाद्यांची अनेक तळ उद्ध्वस करण्यात आली आहेत. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेचा बदला म्हणून हिंदुस्थानने ऑपरेशन सिंदूर राबवलं आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;