Operation Sindoor – POK मधील एअर स्ट्राईकनंतर हिंदुस्थानमधील 16 विमानतळं बंद; Air India, Indigo, Spicejet ची उड्डाणं रद्द
पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकनंतर देशातील 16 विमानतळं बंद करण्यात आली आहेत. या विमानतळांवरील विमान वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. श्रीनगर, जम्मू, लेह, चंदीगड, बिकानेर, जोधपूर, राजकोट, धर्मशाळा, अमृतसर, भूज, जामनगर, जैसलमेर, भटिंडा, शिमला, राजकोट, पोरबंदर येथील विमानतळं बंद केली आहेत. ही सर्व विमानतळं पाकिस्तान सीमेला लागून आहेत.
जम्मू-कश्मिर, पंजाब आणि राजस्थानमधील अनेक जिल्ह्यांतील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. करतापूर कॉरिडोरही बंद केला गेला आहे. एअर इंडिया, इंडिगो आणि स्पाईस जेटच्या विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. एअर इंडियाने 9 शहरांमधील सर्व उड्डाणे 10 मेपर्यंत सकाळी 5.29 पर्यंत रद्द केली आहेत. जम्मू, श्रीनगर, अमृतसर, लेह, चंदीगड, धर्मशाळा, बिकानेर, जोधपूर, ग्वाल्हेर, किशनगड आणि राजकोट या शहरांचा यात समावेश आहे.
इंडिगो एअरलाइन्सने 11 शहरांमधील सर्व उड्डाणं 10 मे रोजी सकाळपर्यंत म्हणजे शनिवार सकाळपर्यंत रद्द केली आहेत. यात जम्मू, श्रीनगर, लेह, अमृतसर, चंदीगडसह इतर शहरांचा समावेश आहे. स्पाईसजेटनेही 6 शहरांमधील सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. इंडिगोने शनिवारपर्यंत 165 देशांतर्गत उड्डाणे रद्द केली आहेत. दिल्ली विमानळावरील वेगवेगळ्या एअरलाइन्सची 20 उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List