“मी आतून संपले..”; सोहैल खानच्या पूर्व पत्नीने सांगितला घटस्फोटादरम्यान कोर्टातील ‘तो’ अनुभव

“मी आतून संपले..”; सोहैल खानच्या पूर्व पत्नीने सांगितला घटस्फोटादरम्यान कोर्टातील ‘तो’ अनुभव

अभिनेता सोहैल खान आणि सीमा सजदेह यांनी लग्नाच्या तब्बल 24 वर्षांनंतर घटस्फोट घेतला. 2022 मध्ये हे दोघं अधिकृतरित्या विभक्त झाले. अनेक उदाहरणांमध्ये घटस्फोटाचा भावनिक परिणाम फार काळापर्यंत राहतो. असाच काहीसा अनुभव सीमाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितला. या मुलाखतीत तिच्यासोबत अभिनेता इमरान खानची पूर्व पत्नी अवंतिका मलिकसुद्धा होती. या दोघींच्या घटस्फोटाला काही वर्षे झाली असली तरी कायदेशीर प्रक्रियांच्या मानसिक धक्क्यातून त्या अजूनही सावरल्या नाहीत. एकीकडे जोडीदार आणि कुटुंबीयांपासून दूर होण्याच्या वेदना असतानाच घटस्फोटाच्या प्रक्रियेदरम्यान कौटुंबिक न्यायालयात येणाऱ्या अनुभवामुळे तुम्ही आणखी खचता, असं त्यांनी म्हटलंय.

याबद्दल सीमा म्हणाली, “ज्याप्रकारे ते तुमचं नाव मोठ्याने ओरडून बोलवतात, तेव्हा रेल्वे स्टेशनवर असल्यासारखं वाटतं. ते मोठमोठ्याने तुमचं नाव वाचतात आणि लोक तुमच्याकडे बघत बसतात. त्यावेळी तुम्हाला खूप लहान असल्यासारखं, तुमचं काहीच महत्त्व नसल्यासारखं आणि तुमची काहीच गरज नसल्यासारखं वाटतं. मला अजूनही आठवतंय, हे सर्व फक्त इतक्यासाठीच होतं का? या सगळ्या गोष्टींचा अंत हात आहे का? असे प्रश्न मला पडले होते. जेव्हा न्यायाधीशांनी म्हटलं की, ‘घटस्फोट झाला’, तेव्हा मी आतून संपले होते.”

याच मुलाखतीत अवंतिकानेही तिचा कोर्टातील अनुभव सांगितला. “शेवटच्या वेळी जेव्हा मी कोर्टात गेले, तेव्हा मी माझ्या वकिलांना सांगितलं की, जेव्हा कधी माझ्या मनात असा विचार आला की, अरे चला पुन्हा लग्न करुयात, तेव्हा मला फॅमिली कोर्टातील हा क्षण आठवण्याची खूप गरज असेल”, असं ती म्हणाली.

सीमा ही फॅशन डिझायनर असून तिने 1998 मध्ये सोहैल खानशी लग्न केलं होतं. विशेष म्हणजे सोहैलशी लग्न करण्यासाठी तिने बिझनेसमन विक्रम अहुजाशी साखरपुडा मोडला होता. सोहैल आणि सीमाला निर्वाण आणि योहान ही दोन मुलं आहेत. आता घटस्फोटानंतर सीमा आणि विक्रम एकमेकांना डेट करत आहेत. खुद्द सीमानेच याची कबुली दिली होती. विक्रम बॉयफ्रेंड म्हणून माझ्या आयुष्यात परत आलाय, असं तिने सांगितलं.

“आयुष्य खूप छोटं आहे. ते मनसोक्त जगा आणि आनंदी राहा. हास्य हे सर्वोत्कृष्ट औषध आहे आणि ज्यादिवशी तुम्ही एकत्र हसणं थांबवता, तेव्हा सर्व गोष्टी संपतात. तुम्ही अशा टप्प्यावर पोहोचायला हवं जेव्हा तुम्ही परत तुमच्या जोडीदारावर प्रेम करू शकाल. तुम्ही त्याचा द्वेष करू नका. लग्नात तुम्ही इतके आत्मसंतुष्ट असता. त्यावेळी जर तुम्ही विचारलं असता, तर कदाचित मी सोहैलवर सगळा दोष दिला असता”, अशी प्रतिक्रिया सीमाने तिच्या घटस्फोटाबद्दल दिली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबईत मॉक ड्रीलदरम्यान काय होणार, ब्लॅकआऊट कुठे आणि कधी? जाणून घ्या A टू Z माहिती मुंबईत मॉक ड्रीलदरम्यान काय होणार, ब्लॅकआऊट कुठे आणि कधी? जाणून घ्या A टू Z माहिती
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर उद्या बुधवार (7 मे) देशभरात अनेक ठिकाणी मॉक ड्रिल केले जाणार आहे. महाराष्ट्रातील...
राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस, पुढील 3 तास धोक्याचे, हवामान विभागाचा अंदाज काय?
स्थानिक स्वराज्य संस्थांतील लोकशाहीची पायमल्ली होऊ देणार नाही, न्यायालयाचा हा निर्णय आश्वासक – सुप्रिया सुळे
मुंबई, ठाण्यासह राज्यात पावसाची हजेरी, वादळी वाऱ्यासह कोसळल्या हलक्या सरी
Pahalgam Attack : रशियानंतर आता या ताकदवान इस्लामिक देशाने PM MODI यांच्याशी हस्तांदोलन, भारताला दिला संपूर्ण पाठींबा
गर्लफ्रेंडसोबत असल्यावर घरी असलेल्या बायकोसाठी…, विवाहबाह्य संबंधाचा शत्रुघ्न सिन्हा यांना पश्चात्ताप
Rain Update – मुंबई नाशिकसह महाराष्ट्रात पावसाचं मॉक ड्रिल, नागरिकांची तारांबळ